AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid -19 : देशात कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ, आकडा 3000 पार, महाराष्ट्रासह केरळमध्ये अलर्ट

Corona Patient : देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या 3000 हून अधिक झाली आहे. त्यात केरळमध्ये सर्वाधिक 1336 प्रकरणं समोर आले आहे.

Covid -19 : देशात कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ, आकडा 3000 पार, महाराष्ट्रासह केरळमध्ये अलर्ट
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 01, 2025 | 8:57 AM
Share

Coronavirus Update : देशभरात कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. गेल्या सात दिवसात देशभरातील सक्रिय रुग्णांचा आकडा 3000 च्या वर पोहचला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1336 रुग्ण आढळले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, शनिवारी कोरोना प्रकरणांची संख्या तीन हजारांपेक्षा जास्त झाली. आता हा आकडा ,3,395 वर पोहचला. केरळनंतर महाराष्ट्र, दिल्लीचा क्रमांक आहे. गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे.

महाराष्ट्रात 467 तर दिल्लीत 375 रुग्ण

शनिवारी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. त्यात दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी एक जण दगावला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 467 तर दिल्लीत 375, गुजरातमध्ये 265, कर्नाटकमध्ये 234, पश्चिम बंगालमध्ये 205, तमिलनाडूमध्ये 185 आणि उत्तर प्रदेशात 117 रुग्ण संख्या आहे.

भारतात कोविड रुग्णांची संख्या वाढली

22 मे रोजी देशात 257 सक्रिय रुग्ण होते. 26 मे रोजी हा आकडा 1010 इतका झाला. तर शनिवारी हा आकडा 3,395 वर पोहचला. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 685 नवीन रुग्णांची भर पडली. त्यात चार लोकांचा मृत्यू झाला. कोविड-19 वर लक्ष ठेवणाऱ्या वर्ल्डोमीटर इंडेक्सनुसार देशात पहिल्यांदाच 3,000 सक्रिय रुग्ण आढळले. गेल्या वेळी 1 एप्रिल, 2023 रोजी हा असा आकडा आला होता. तेव्हा देशभरात 3,084 सक्रिय रुग्ण होते.

आरोग्य विभाग सतर्क

शुक्रवारी केंद्रीय आरोग्य आणि आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र कोणतीही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी केंद्रीय आरोग्य विभाग आणि आयुष्य मंत्रालय पूर्णपणे सतर्क असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.

हे व्हेरिएंट या राज्यात सक्रिय

नवीन कोरोना लाटेत ओमिक्रॉनचा JN.1 व्हेरिएंट आणि त्याचे सर्व व्हेरिएंट्स LF.7 आणि NB.1.8 जबाबदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 ला डिसेंबर 2023 मध्ये व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट जाहीर केला होता. हा व्हेरिएंट जास्त संक्रमक असल्याचे दावा करण्यात येत आहे. अर्थात हा इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक नाही. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, घश्यात खवखव होणे आणि शारीरिक दुखणे अशी लक्षणे दिसतात.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.