Coronavirus: लहान मुलांमध्ये आढळणारी कोव्हिड-19ची लक्षणं कोणती?

ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. | Coronavirus symptoms

Coronavirus: लहान मुलांमध्ये आढळणारी कोव्हिड-19ची लक्षणं कोणती?
कोरोना व्हायरस
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 12:35 PM

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना आणि तरुणांना कोव्हिडच्या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. कोरोना व्हायरसचे नवीन स्ट्रेन, रुग्णसंख्या कमी झाल्याने मुलांनी खेळायला घराबाहेर पडणं, घरातल्या मोठ्यांची सुरू झालेली ऑफिसेस आणि त्यानिमित्ताने होणारा प्रवास या कारणांमुळे लहान मुलं वेगाने बाधित होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. (Covid second wave affected childrens rapidly also found MIS – C)

लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसची कोणती लक्षणं आढळतात?

* पोट बिघडणं * उलट्या होणं * डोकेदुखी * बेशुद्ध पडणं * सतत चिडचिड करणं, त्रागा करणं (अगदी लहान मुलांमध्ये) * अंगावर पुरळ येणं * डोळे लाल होणं * हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं * ताप * कोरडा खोकला, घसा खवखवणं * धाप लागणं * तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं

कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक

कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जातायत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येतायत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरतायत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती, मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा असल्यामुळे ती लवकर बरी व्हायची. मात्र नव्या कोरोनाची जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं ही लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोनातून बरं झाल्यानंतरही लहान मुलांना धोका?

कोरोनातून पूर्णपणे बरं झाल्यानंतरही लहान मुलांना त्रास जाणवत असल्याचेही डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक मुलांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये MIS – C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन ही समस्या उद्धभवताना दिसत आहे.

त्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागात दुखणे, पोट बिघडणं, पोटात दुखणं, उलट्या, अंगावर पुरळ उमटणं, डोळे लाल होणं, ताप येणं, जीभ – घसा लाल होणे, असे परिणाम पाहायला मिळत आहेत. MIS – C वर तातडीने उपचार होणं गरजेचं असतं. हृदय, फुफ्फुसं, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा, पोटातील आतडी या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी मुलांमध्ये ही लक्षणं आढळल्यास त्यांना पूर्वी कोव्हिड होऊन गेला होता का, याविषयी डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

सावधान ! लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं, नव्या आकडेवारीमुळे पालकांची चिंता वाढणार

कोरोना पॉझिटीव्ह आईदेखील करू शकते नवजात बाळाला स्तनपान, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

Maharashtra Lockdown: मला लोकांना घाबरवयाचं नाही, पण इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता: डॉ. संजय ओक

(Covid second wave affected childrens rapidly also found MIS – C)

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.