AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांऐवजी बाळासाहेबांचं नाव देण्याचं उद्धव ठाकरे यांनीच सूचवलं होतं; मुख्यमंत्र्याचा गौप्यस्फोट

विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्यायचं होतं. मात्र त्या नावाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर तुम्ही बैठकीतून दोन ते तीन वेळा उठून गेला हेही सर्वांना माहिती आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांऐवजी बाळासाहेबांचं नाव देण्याचं उद्धव ठाकरे यांनीच सूचवलं होतं; मुख्यमंत्र्याचा गौप्यस्फोट
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 05, 2022 | 10:35 PM
Share

मुंबईः दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आजच्या दसरा मेळाव्यानिमित्त (dussehra rally)  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. गद्दारी आणि गदर या दोन्ही शब्दांवर जोरदार हल्ला प्रतिहल्ला करत शिवसेना ही जहांगीर नाही असंही स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुंबई विमान तळाचाही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

मुंबईच्या विमानतळाचा मुद्दा उपस्थित करत त्याच्या नामाकरणाचेही राजकारण उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचे सांगत असं खोटे का करता म्हणून त्यांनी सवाल उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाच्या नामाकरणाचा मुद्दा उपस्थित करुन म्हणाले की, विमानतळाच्या प्रकल्पाचे काम तुम्ही सुरु केले. आणि नव्या मुंबईच्या विमानतळाचं नावही तुम्हीच मला सांगितलं असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं तुम्ही पत्रं द्या म्हणून तुम्हीच मला सांगितला. त्यावेळी मला नक्कीच अभिमन वाटला. मात्र आपण बाळासाहेबांचं नाव समृद्धी महामार्गाला दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्यायचं होतं. मात्र त्या नावाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर तुम्ही बैठकीतून दोन ते तीन वेळा उठून गेला हेही सर्वांना माहिती असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, मी दि. बा. पाटील यांच्या मुलाला भेटलो, आणि तुम्ही त्यांना सांगतो. हा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं.

अरे असं का करता, एवढा खोटारडेपणा का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा गौरव करत ते म्हणाले की, बाळासाहेब जे बोलायचे ते एकदाच बोलायचे. एकदा बोलल्यावर ते कधीच माघार घेत नव्हते.

मात्र आता तुमचा खोटारडेपणा त्यांना कळला असल्याचे सांगत मराठा समाजाच्या मूक मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हटला असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...