मुंबईसह उपनगरात पारा घसरला, किमान तापमान 14 अंशावर

मुंबई हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईमध्ये सध्या कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असून किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस आहे. (weather report mumbai maharashtra)

मुंबईसह उपनगरात पारा घसरला, किमान तापमान 14 अंशावर

मुंबई : मुंबईसह (mumbai) ठाणे, नवीमुंबईसारख्या उपनगरांतील तापमानामध्ये घट झाली आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना तापमानातील हा बदल जाणवला. मुंबई हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईमध्ये सध्या कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असून किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मागील 48 तासांपासून तापमानात हा चढउतार दिसून यतोय. (daily weather report of mumbai and maharashtra)

तापमानात सातत्याने घट

मुंबई शहरात तापमानात सातत्याने घट होत आहे. काल (28 डिसेंबर) शहराचे कमाल तापमान 30.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तर कमाल तापमान 16 अंशावर आले होते. कालच्या तुलनेत आज तापमानात पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळाले. तशी सूचना मुंबई प्रातदेशिक हवामान विभागाने दिली होती. याबाबत सांगताना ठाणे, मुंबई, नवीमुंबईत या भागात सकाळी तापमानात तीव्र घट होण्याची शक्यता मुंबई प्रादेशकि हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी वर्तवली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईचे किमान तापमान 15 अंशाच्या आसपास असेल, असे सांगितले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी तापमानात घट होऊन पारा  16 अंशापर्यंत आला होता.

तापमानात आणखी घट होण्याची शक्यता 

दरम्यान, देशातही थंडीचा पारा खाली येताना पाहायला मिळतोय. मुबंईत थंडी वाढल्याने लोकं स्वेटर, कानटोपी, हातमोजे घालून घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. गार्डनमध्ये व्यायाम करण्यासाठी नेहमी गर्दी असते मात्र थंडी वाढल्याने या संख्येत घट झाल्याचेही पाहायला मिळाले. तर काही लोक या थंडीची आनंद लुटताना दिसत आहेत. यावेळी नववर्षाच्या सुरवातीपासूनच पारा आणखी घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

संबंधित बातम्या :

”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या”

New Year Celebration | यंदा घरीच साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, राज्य सरकारकडून 31 डिसेंबरसाठी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईचा महापौर आपल्याशिवाय बसू शकत नाही, काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला इशारा?

(daily weather report of mumbai and maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI