एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा, गोंदियातील बदलीला स्थगिती

दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात आलं होतं.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा, गोंदियातील बदलीला स्थगिती
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 5:20 PM

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक ( Daya Nayak) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आलीय. दया नायक यांची बदली करण्यात आली होती. त्यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं होतं. पण आता दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात आलं होतं. नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली करत, त्यांची रवानगी गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात करण्यात आली होती. (MAT postpones replacement of encounter specialist Daya Nayak)

शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आलेल्या धमक्यांचा तपास

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याच्या तपासाचं कामसुद्धा दया नायक यांच्याकडेच होते. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते.या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं.

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसमार्फतही करण्यात येत होता. एटीएस मार्फत या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 6 टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यातील जुहू एटीएसच्या टीमचे प्रभारी इन्चार्ज म्हणून दया नायक काम पाहत होते.

कोण आहेत दया नायक ?

>> मुंबई पोलिसमध्ये सध्या PI म्हणून कार्यरत असलेल्या दया नायक यांच्याकडे जुहू एटीएसची जबाबदारी आहे.

>> 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

>> प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. 1998-99 पासून नायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

>> 1996 साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता. आतापर्यंत जवळपास 80 एनकाउंटर दया नायक यांच्या नावावर आहेत.

>> दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले आहेत. 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती.

>> बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती.

>> 2012 साली दया नायक यांना सेवेत परत घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं.

>> त्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या जुहूचौकी युनिटचे प्रमुख आहेत.

संबंधित बातम्या :

Mansukh Hiren Case : 80 एन्काऊंटर करणाऱ्या दया नायकांच्या हाती ठाकरे सरकारची इभ्रत, हिरेन प्रकरण तडीस नेणार?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ची एन्ट्री, दया नायक ATS कार्यालयात

MAT postpones replacement of encounter specialist Daya Nayak

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.