AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mansukh Hiren Case : 80 एन्काऊंटर करणाऱ्या दया नायकांच्या हाती ठाकरे सरकारची इभ्रत, हिरेन प्रकरण तडीस नेणार?

जुहू एटीएसच्या टीमचे प्रभारी इन्चार्ज म्हणून दया नायक काम पाहत आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा रविवारी ATSचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

Mansukh Hiren Case : 80 एन्काऊंटर करणाऱ्या दया नायकांच्या हाती ठाकरे सरकारची इभ्रत, हिरेन प्रकरण तडीस नेणार?
मनसुख हिरेन प्रकरणात एन्काऊंट स्पेशालिस्ट दया नायक यांच्याकडून तपास सुरु
| Updated on: Mar 22, 2021 | 8:00 PM
Share

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एटीएस मार्फ़त या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 6 टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यातील जुहू एटीएसच्या टीमचे प्रभारी इन्चार्ज म्हणून दया नायक काम पाहत आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा रविवारी ATSचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. या प्रकरणाचा तपास तडीस नेण्यासाठी दया नायक यांची भूमिका महत्वाची मानली जाते.(Encounter specialist Daya Nayak has started investigation in Mansukh Hiren case)

कोण आहेत दया नायक ?

>> मुंबई पोलिसमध्ये सध्या PI म्हणून कार्यरत असलेल्या दया नायक यांच्याकडे जुहू एटीएसची जबाबदारी आहे.

>> 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

>> प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. 1998-99 पासून नायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

>> 1996 साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता. आतापर्यंत जवळपास 80 एनकाउंटर दया नायक यांच्या नावावर आहेत.

>> दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले आहेत. 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती.

>> बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती.

>> 2012 साली दया नायक यांना सेवेत परत घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं.

>> त्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या जुहूचौकी युनिटचे प्रमुख आहेत.

मनसुख हिरेनच्या हत्येमागे सचिन वाझेचाच हात

मनसुख हिरेन प्रकरणात NIAच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेचाच हात असल्याची माहिती आता मिळत आहे. एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. विनायक शिंदे याने मनसुख हिरेनच्या हत्येमागे वाझेचाच हात असल्याची कबुली दिल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, रविवारी एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करत मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर एटीएसच्या एका बड्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.(Sachin Waze was involved in Mansukh Hiren murder case)

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास सध्या एटीएस करत आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास एनआयए करत आहे. आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही एनआयए करणार आहे. तत्पूर्वी एटीएसच्या टीमने हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. मनसुख हिरेन हत्येमागे सचिन वाझेचाच हात असल्याचा दावा एटीएसमधील अधिकाऱ्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

‘वाझे साहेबच मेन आहेत, काही होणार नाही’; मनसुख हिरेनचे भावासोबतचे फोनवरील संभाषण उघड

सचिन वाझेंवर आता ‘ईडी’ची वक्रृष्टी? महागड्या गाड्या, पैसं मोजण्याच्या मशीनमुळे आणखी गोत्यात

Encounter specialist Daya Nayak has started investigation in Mansukh Hiren case

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.