AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

maharashtra lok sabha election result: पराभवाची जबाबदारी स्वीकारात देवेंद्र फडणवीस यांचा धक्कादायक निर्णय, आता सरळ…

Lok Sabha election Defeat, Devendra Fadnavis big design: मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

maharashtra lok sabha election result: पराभवाची जबाबदारी स्वीकारात देवेंद्र फडणवीस यांचा धक्कादायक निर्णय, आता सरळ...
Devendra FadnavisImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 05, 2024 | 3:13 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपचा पराभव का झाला? त्याचे कारणे माध्यमांना सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे सांगताना म्हटले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात महत्वाचा ठरला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला. तसेच विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो.

शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूस याचे दर कमी झाले. त्यानंतर आम्ही मदत केली. परंतु आचारसंहितेमुळे तो निर्णय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नेऊ शकलो नाही.

पराभवाची कारणे सांगितले

  • महायुतीच्या पराभवाची कारणे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी सांगितली. फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख मते मिळाली. महायुती २ कोटी ४८ लाख म्हणजे मते मिळाली. म्हणजे फक्त दोन लाख मते कमी मिळाली.
  • मुंबईत महाविकास आघाडीला २४ लाख मते मिळाली. महायुतीला २६ लाख म्हणजे दोन लाख मते जास्त मिळाली आहेत. त्यानंतर चार जागा गेल्या. राज्यातील आठ जागांवर ४ टक्के मतांचा फरक राहिला. तसेच ६ जागांवर ३० हजार मते कमी मिळाली.
  • २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २७. ८४ टक्के मते होती. त्यावर २३ जागा होती. यावेळी २६.१७ टक्के मिळाली. त्यानंतर केवळ ९ जागा मिळाल्या. काँग्रेसला २०१९ मध्ये १६.४१ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी एक जागा होती. आता १७ टक्के मते मिळून त्यांच्या जागा १३ झाल्या.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा