Mumbai Delta plus variant : धाकधूक वाढली, मुंबईत ‘डेल्टा प्लस’ने पहिला मृत्यू

मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. मुंबईत डेल्टा प्लसचे 11 रूग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Delta plus variant : धाकधूक वाढली, मुंबईत 'डेल्टा प्लस'ने पहिला मृत्यू
delta plus

मुंबई : मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. मुंबईत डेल्टा प्लसचे 11 रूग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 63 वर्षीय महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह होती. ही महिला फुप्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. तसेच कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. शिवाय, ती घरीच ऑक्सिजनवर होती. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, या महिलेची 21 जुलै रोजी चाचणी करण्यात आली होती. 24 जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, 27 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. मात्र, पालिकेकडे बुधवारी 11 ऑगस्ट रोजी ती महिला रूग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तत्पूर्वी तिच्या मृत्यूची नोंद कोव्हिड पॉझिटिव्ह अशीच करण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर त्यांचा कोव्हिड अहवाल जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला होता. जीनोम सिक्वेसिंग अहवालातून त्या डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 64 वर

दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी 20 नवे डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईत 7, पुणे 3, रायगड, पालघर, नांदेड, गोंदियात प्रत्येकी 2, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्णांची संख्या 64 वर पोहोचली आहे.

डेल्टा व्हेरिएंट आणि कोविड-19 मध्ये फरक काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, एक विषाणू स्वतःच आपली रूपे बनवितो. या बदलांना ‘उत्परिवर्तन’ म्हणून ओळखले जाते. तसेच एक किंवा अधिक उत्परिवर्तन असलेल्या व्हायरसना ‘व्हेरिएंट’ असे म्हणतात. जेव्हा आपण मूळ COVID-19 विषाणूबद्दल बोलतो, ज्याला सार्स-कोव्ह -2 विषाणू म्हणतात, तर त्याचे रूपांतर अनेक संख्यात्मक स्ट्रेन्समध्ये झाले आहे. त्यापैकी डेल्टा व्हर्जन, ज्याला B.1.617.2 म्हणतात. हा व्हर्जन सर्वात प्रमुख स्ट्रेन आहे. संशोधनानुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्रात ओळख पटलेल्या व्हेरिएंटला E484Q आणि L452R या उत्परिवर्तनांदरम्यान क्रॉस कारण्यादरम्यान ओळखले जाते.

डेल्टा व्हेरिएंटची लक्षणे कोणती?

लक्षण अॅपच्या माध्यमातून जमा केलेल्या आकडेवारीनुसार, खोकला, घसा खवखवणे, ताप आणि डोकेदुखी ही कोविड-19 ची ही सामान्य लक्षणे आहेत. तसेच सतत नाक वाहत राहणे, या लक्षणाचा सामान्य लक्षणांमध्ये समावेश नाही. कारण हे लक्षण सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. कोरोना आणि सध्या चिंता वाढवत असलेल्या डेल्टा व्हेरिएन्टची लक्षणे काय आहेत, त्यामध्ये नेमका फरक काय आहे हे आपल्याला जाणून घेणे सध्या खूप गरजेचे आहे.

संबंधित बातम्या  

डेल्टा व्हेरिएंटची लक्षणे मूळ कोरोनापेक्षा वेगळी; जाणून घ्या नेमका काय आहे फरक

ठाण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव, 4 रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

CM Uddhav Thackeray Live : 15 ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार पण अटी शर्थी लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Published On - 8:05 am, Fri, 13 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI