डेल्टा व्हेरिएंटची लक्षणे मूळ कोरोनापेक्षा वेगळी; जाणून घ्या नेमका काय आहे फरक

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2021 | 8:00 AM

विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे दोन घटकांवर अवलंबून असतात, पहिल्या घटकात रिप्लिकेशनची गती, संसर्गाचे प्रमाण, संक्रमणाची पद्धत आणि बरेच काही समाविष्ट आहे. दुसऱ्या घटकामध्ये लिंग, वय, आरोग्य, व्यायाम, औषधे आणि तणाव यांचा समावेश आहे. (The symptoms of the Delta variant are different from the original corona; know exactly what the difference is)

डेल्टा व्हेरिएंटची लक्षणे मूळ कोरोनापेक्षा वेगळी; जाणून घ्या नेमका काय आहे फरक
delta plus

Follow us on

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र आता कोरोनाची नवीन रूपे दिसू लागली आहेत. या नव्या रूपांमुळे देशात महामारीची परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, परंतु डेल्टा आणि डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातील लोकांच्या जीविताला अधिक धोका उद्भवला आहे. अलिकडील निष्कर्षांवरून असे आढळून आले आहे की, डेल्टाची लक्षणे मूळ कोविड -19 विषाणूच्या लक्षणांपेक्षा भिन्न असू शकतात. (The symptoms of the Delta variant are different from the original corona; know exactly what the difference is)

डेल्टा व्हेरिएंट आणि कोविड-19 मध्ये फरक काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, एक विषाणू स्वतःच आपली रूपे बनवितो. या बदलांना ‘उत्परिवर्तन’ म्हणून ओळखले जाते. तसेच एक किंवा अधिक उत्परिवर्तन असलेल्या व्हायरसना ‘व्हेरिएंट’ असे म्हणतात. जेव्हा आपण मूळ COVID-19 विषाणूबद्दल बोलतो, ज्याला सार्स-कोव्ह -2 विषाणू म्हणतात, तर त्याचे रूपांतर अनेक संख्यात्मक स्ट्रेन्समध्ये झाले आहे. त्यापैकी डेल्टा व्हर्जन, ज्याला B.1.617.2 म्हणतात. हा व्हर्जन सर्वात प्रमुख स्ट्रेन आहे. संशोधनानुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्रात ओळख पटलेल्या व्हेरिएंटला E484Q आणि L452R या उत्परिवर्तनांदरम्यान क्रॉस कारण्यादरम्यान ओळखले जाते.

मूळ कोविडच्या लक्षणांपेक्षा डेल्टा व्हर्जन भिन्न कसा?

विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे दोन घटकांवर अवलंबून असतात, पहिल्या घटकात रिप्लिकेशनची गती, संसर्गाचे प्रमाण, संक्रमणाची पद्धत आणि बरेच काही समाविष्ट आहे. दुसऱ्या घटकामध्ये लिंग, वय, आरोग्य, व्यायाम, औषधे आणि तणाव यांचा समावेश आहे. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट विषाणूच्या लक्षणांबद्दल बोलतो, तेव्हा सर्वात सामान्य लक्षण शोधण्यासाठी संक्रमित व्यक्तीकडून डेटा गोळा केला जातो. डेल्टा व्हेरिएंट हा मूळ परिवर्तनाचा बदललेला प्रकार आहे. या उत्परिवर्तनादरम्यान लक्षणेही बदलली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे युकेच्या सेल्फ-रिपोर्टिंग सिस्टमनुसार, कोविड -19 चे सर्वात सामान्य लक्षण मूळ लक्षणांच्या तुलनेत बदलले जाऊ शकते.

डेल्टा व्हेरिएंटची लक्षणे कोणती?

लक्षण अॅपच्या माध्यमातून जमा केलेल्या आकडेवारीनुसार, खोकला, घसा खवखवणे, ताप आणि डोकेदुखी ही कोविड-19 ची ही सामान्य लक्षणे आहेत. तसेच सतत नाक वाहत राहणे, या लक्षणाचा सामान्य लक्षणांमध्ये समावेश नाही. कारण हे लक्षण सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. कोरोना आणि सध्या चिंता वाढवत असलेल्या डेल्टा व्हेरिएन्टची लक्षणे काय आहेत, त्यामध्ये नेमका फरक काय आहे हे आपल्याला जाणून घेणे सध्या खूप गरजेचे आहे. (The symptoms of the Delta variant are different from the original corona; know exactly what the difference is)

इतर बातम्या

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास अशी नोंदवा तक्रार, लवकरच होईल निवारण

MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न एक महिन्यात सोडवू, स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर वडेट्टीवारांचं आश्वासन

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI