महाराष्ट्रात हे चालले तरी काय?…. देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Sep 19, 2021 | 9:12 PM

आपण आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर घोटाळ्यांचा आरोप केला आहे. त्यामुळे सरकारचे पितळ उघडे पडणार असल्यानेच या कारवाईच्या माध्यमातून दबावतंत्र अवलंबले जात आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

महाराष्ट्रात हे चालले तरी काय?.... देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याच्या राज्य सरकारच्या कारवाईचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडीच्या राज्यात महाराष्ट्रात चाललेय तरी काय? ज्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार करतो आहे, हे आधी जाहीर केले, त्यांनाच पोलिस स्थानबद्ध करीत आहेत. लोकशाही अस्तित्वात आहे का? अशा शब्दांत फडणवीस यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. सोमय्या यांच्यावरील कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आम्ही या कारवाईचा निषेध करतो. अशा कितीही कारवाई केल्या तरी आमचा राज्य सरकारविरोधात संषर्घ सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. (Devendra Fadnavis criticizes Mahavika Aghadi over Kirit Someya case)

किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. तसेच त्यांना कार्यालयात पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. आपण आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर घोटाळ्यांचा आरोप केला आहे. त्यामुळे सरकारचे पितळ उघडे पडणार असल्यानेच या कारवाईच्या माध्यमातून दबावतंत्र अवलंबले जात आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. याचदरम्यान त्यांच्या समर्थनार्थ भाजपच्या इतर नेत्यांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करून कारवाईचा निषेध केला.

किरीट सोमय्यांचे नेमके आरोप काय?

किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले होते?

किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत, असे मुश्रीफ म्हणाले होते. (Devendra Fadnavis criticizes Mahavika Aghadi over Kirit Someya case)

इतर बातम्या

लोकांचे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यापेक्षा त्यांचे प्रश्न पहा; किरीट सोमैय्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुख्य मंदिरातील कुंडात ‘दगडूशेठ’च्या गणपतीचं विसर्जन, भाविकांकडून ऑनलाईन दर्शन