Bigg Boss Marathi highlights : बिग बॉस मराठी 3ची सुरुवात, आजपासून राडा आणि मनोरंजनाचा मेळ, घरात कोणाची एन्ट्री होणार ?

बिग बॉस मराठी हा शो कधी सुरु होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा आता संपली आहे. बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

Bigg Boss Marathi highlights : बिग बॉस मराठी 3ची सुरुवात, आजपासून राडा आणि मनोरंजनाचा मेळ, घरात कोणाची एन्ट्री होणार ?

मुंबई: बिग बॉस मराठीचे  पुढचे पर्व कधी सुरु होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा आता संपली आहे. बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची आजपासून सुरुवात झाली आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील 15 सेलिब्रेटींचा सहभाग

बिग बॉस मराठी कार्यक्रमात इतर बिग बॉस कार्यक्रमाप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातील 15 सेलिब्रेटी 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात बंद राहतील. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण कलर्स मराठी या वाहिनीवर दररोज रात्री 9 वाजता होईल. याशिवाय वूटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारेदेखील हा कार्यक्रम पाहायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 19 Sep 2021 22:47 PM (IST)

  सर्वांचा लाडका दादुस म्हणजेच संतोष चौधरी बिग बॉस मराठीच्या घरात

 • 19 Sep 2021 22:36 PM (IST)

  अभिनेता अक्षय वाघमारेचीही स्पर्धक म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश

 • 19 Sep 2021 22:21 PM (IST)

  मीनल शाहचा बिग बॉसच्या घरात प्रवेश, आता खेळ रंगणार

 • 19 Sep 2021 22:16 PM (IST)

  जय दुधाणेचा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश, अनलिमिटेड मनोरंजनाची मेजवानी

 • 19 Sep 2021 22:11 PM (IST)

  बिग बॉस मराठीच्या सिझन तीनच्या घरात अभिनेता विकास पाटीलचा प्रवेश

 • 19 Sep 2021 22:10 PM (IST)

  प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला बाळासाहेबची पाटीलची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री

 • 19 Sep 2021 22:09 PM (IST)

  अभिनेत्री  गायत्री दातारही ट्रॉफी जिंकण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात

 • 19 Sep 2021 22:08 PM (IST)

  अभिनेत्री सुरेखा कुडचीचा बिग बॉस मराठीच्या घरात मुक्काम

 • 19 Sep 2021 21:36 PM (IST)

  सुरेखा कुडचीचा ठसकेबाज परफॉर्मन्स

 • 19 Sep 2021 21:29 PM (IST)

  सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचाही बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश

  बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्याची एन्ट्री

  सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई स्पर्धक म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात दाखल

   

 • 19 Sep 2021 21:26 PM (IST)

  अभिनेता अविष्कार दारव्हेकरची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री

 • 19 Sep 2021 20:59 PM (IST)

  MI vs CSK : जाडेजा आऊट!

  img

  ऋतुराजने अर्धशतक ठोकताच पुढच्याच षटकात बुमराहच्या चेंडूवर जाडेजा बाद झाला आहे. पोलार्डने त्याचा झेल घेतला आहे.

 • 19 Sep 2021 20:34 PM (IST)

  बिग बॉस मराठीच्या घरात शेरास-सव्वा शेर, अभिनेत्री मीरा जगन्नाथची एन्ट्री, दिली मनोरंजनाची हमी

 • 19 Sep 2021 20:30 PM (IST)

  अभिनेता विशाल निकमची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री

 • 19 Sep 2021 20:29 PM (IST)

  बिग बॉस मराठी 3 च्या घरात सोनाली पाटीलचा प्रवेश, पुढचे 100 दिवस फक्त मनोरंजन

  बिग बॉस मराठी 3 च्या घरात मराठमोळ्या सोनाली पाटील दिसणार आहे.

  सोनाली  बिग बॉस मराठी 3 च्या मंचावर  स्पर्धक म्हणून आपल्याला दिसणार आहे.

 • 19 Sep 2021 20:25 PM (IST)

  महाराष्ट्राचा लाडका गायक डॉ. उत्कर्ष शिंदेची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री

 • 19 Sep 2021 20:22 PM (IST)

  स्नेहा वाघची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI