मुख्य मंदिरातील कुंडात ‘दगडूशेठ’च्या गणपतीचं विसर्जन, भाविकांकडून ऑनलाईन दर्शन

गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या... च्या अखंड जयघोषात 'दगडूशेठ' च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले.

मुख्य मंदिरातील कुंडात 'दगडूशेठ'च्या गणपतीचं विसर्जन, भाविकांकडून ऑनलाईन दर्शन

पुणे : गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया…, गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… च्या अखंड जयघोषात ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. विविधरंगी फुलांनी सजवलेल्या गणेश कुंडात रविवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी श्रींचे विसर्जन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. (Pune : Dagdusheth Ganpati Visarjan at temple)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षी उत्सवात सलग दुसऱ्या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

रविवारी सायंकाळी 5.20 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रींची मंगलआरती करण्यात आली. मंदिरामध्येच साकारण्यात आलेल्या गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रींचे विसर्जन झाले. हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने अनुभवला. लस घेऊन कोरोनाला हद्दपार करू या… असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिराबाहेर काढण्यात आली होती.

ऑनलाईन पद्धतीने दगडूशेठ गणपतीचा विसर्जन सोहळा

श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली होती. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर 24 तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या लिंकवर विसर्जन सोहळा आहे. ज्यांना प्रत्यक्ष त्या त्या वेळी हे कार्यक्रम व सोहळा पाहता आलेला नाही, त्या भाविकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घेत हा सोहळा अनुभवावा, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या

Pune: बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला… पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा संपन्न, पाहा फोटो

Video : मिरवणुकीला परवानगी नसतानाही ढोल ताशांचा दणदणाट, तुळशीबाग मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार?

(Pune : Dagdusheth Ganpati Visarjan at temple)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI