Video : मिरवणुकीला परवानगी नसतानाही ढोल ताशांचा दणदणाट, तुळशीबाग मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार?

गणपती बाप्पाचा होणारा जयघोष, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ढोल ताशांच्या गजरात तरुणींनी ठेका धरला आणि मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुक पालखीत बसला आणि तरुणाई बेधुंद होऊन नाचली.

Video : मिरवणुकीला परवानगी नसतानाही ढोल ताशांचा दणदणाट, तुळशीबाग मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार?
पुण्यातील तुळशीबाग गणपती विसर्जन सोहळ्यात पोलिसांकडून ढोल ताशे जप्त


पुणे : गणपती बाप्पाचा होणारा जयघोष, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ढोल ताशांच्या गजरात तरुणींनी ठेका धरला आणि मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुक पालखीत बसला आणि तरुणाई बेधुंद होऊन नाचली. पुण्यात मिरवणुकीला परवानगी नाही हे लक्षात येता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीसांनी हस्तक्षेप करत ढोल ताशा बंद केले. ढोल ताशा बंद करताचं कार्यकर्त्यांनी पोलिसांना 50 लोकांना परवानगी दिल्याचं सांगत ढोल ताशा वाजवू देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी वादकांना पोलीसी खाक्या दाखवताचं ढोल ताशा बंद केले आणि ढोल ताशे जप्त केले.

ढोल ताशे बंद झाले तरीही गणपती बाप्पा करत तरुणाई हातांच्या टाळ्यावर थिरकत होती…पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देताचं अवघ्या 10 मिनीटात गणपती बाप्पाचं विसर्जन गजकुंडात करण्यात आलं आणि 1 वाजून 20 मिनीटांनी गणपती विसर्जित करण्यात आला.

ढोल ताशांच्या तालावर तरुण-तरुणींचा ठेका

तुळशीबाग गणपतीचं विसर्जन करताना कार्यकर्त्यांची गर्दी जशी होती तशीच गर्दी महिलांचीही होती…ढोल ताशांच्या गजरात थिरकण्याचंही महिलांनी सोडलं नाही आणि तरुणी मनसोक्त नाचल्या. एकीकडे कोरोनामुळे मिरवणूका काढण्यास परवानगी दिली नव्हती तर दूसरीकडे बाप्पाला निरोप देण्यासाठी मास्कही तोंडावर पाहायला मिळाला नाही. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले हे अध्यक्षांना विचारताचं त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर ही गर्दी मंडळाच्या कार्यकर्त्यांची नसून बाहेरून आलेल्या नागरिकांची आहे असं सांगत वेळ मारून नेली मात्र पुण्यात सगळे रस्ते बंद केले असताना नागरिक नेमके कुठून आले? हा प्रश्न आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला.

कारवाई होणार का?

कोरोनाला विसरुन कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला खरा मात्र वादकांची नावं लिहून घेतं पोलीसांनी कारवाई करण्याचा इशारा दिलाय. एवढी गर्दी होताना 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त नेमका काय करत होता? जर या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण? या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण आहे? तुळशीबाग मंडळ की बाहेरून आलेले नागरिक? याची चौकशी पोलीस आता करतील मात्र कारवाई करतात का? हे पाहणं महत्वाचंय…

हे ही वाचा :

Ganpati Visarjan 2021 | अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपतीचे विसर्जन का केले जाते? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

Ganesh Visarjan 2021 | गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज

दीड हजार जवान, 100 पोलीस अधिकारी, 500 गृहरक्षक, गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची तयारी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI