Ganesh Visarjan 2021 | गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज

आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 173 विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था केली आहे. स्वयंसेवक, अग्निशमन दल आणि मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही विविध प्रकारची जबाबदारी देण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. नागरिकांनी विसर्जनादरम्यान गर्दी करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ganesh Visarjan 2021 | गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज
Navi Mumbai Police bandobast

नवी मुंबई : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 173 विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था केली आहे. स्वयंसेवक, अग्निशमन दल आणि मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही विविध प्रकारची जबाबदारी देण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. नागरिकांनी विसर्जनादरम्यान गर्दी करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नवी मुंबईमध्ये गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. गणेश मंडळ आणि नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. गणशोत्सवाला आरोग्य उत्सवाचे स्वरुप देण्याचे आवाहनही केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश मंडळांनी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. विसर्जनासाठी शहरात 22 मुख्य तलावांसह 151 कृत्रिम तलाव तयार केले आहेत. कृत्रिम तलावांनाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. विसर्जनासाठीही प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. प्रत्येक तलावांवर स्वयंसेवक, लाईफगार्डस्, अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. जनरेटर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. मूर्तीसोबत विसर्जन स्थळावर येणाऱ्या पुष्पमाळा, दुर्वा, तुळस, शमी फळांच्या साली तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ओले निर्माल्य, मूर्तीच्या गळ्यातील कंठ सजावटीचे सामान, सुके निर्माल्य ठेवण्यासाठी विसर्जन स्थळांवर स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था केली आहे. निर्माल्यांचे पावित्र्य जपत ते वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली.

पोलीस प्रशासनानेही शहरातील बंदोबस्त वाढविला आहे. विसर्जन मार्ग, चौक, तलाव येथे बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. गर्दी करु नये. नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. कुठेही संशयास्पद वस्तू दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आतापर्यंत 18 हजार 286 मूर्तींना निरोप

महानगरपालिका कार्यक्षेत्रात दीड, पाच आणि सात दिवसांच्या विसर्जनदिवशी आतापर्यंत 18 हजार 286 मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावांनाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अनंत चतुर्दशीदिवशीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

महानगरपालिका प्रत्येकवर्षी वाशीतील शिवाजी चौकात मंच उभारुन गणेशमूर्तीवर फुलांची दृष्टी करत असते. परंतु कोरोनामुळे यावर्षीही मिरवणुकांना मनाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडूनही फुलांची वृष्टी केली जाणार नाही. मंडळ आणि नागरिकांनीही साध्या पद्धतीने विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे.

शहरातील प्रमुख विसर्जन स्थळावर जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठीही पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. विसर्जन तलावांच्या परिसरात वाहतूक पोलिसांसह स्वयंसेवकांचे पथक तैनात केले जाणार आहे. नागरिकांनीही वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

विसर्जन तलावांवर गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांनी विसर्जनाच्या वेळेचे ऑनलाईन बुकिंग करावे, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारसाठी 1200 नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग केले आहे.

संबंधित बातम्या :

दीड हजार जवान, 100 पोलीस अधिकारी, 500 गृहरक्षक, गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची तयारी

Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI