AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक महाराष्ट्र सरकारने अखेर ऐकली, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी बातमी

कापूस उत्पादक शेतकरी आजच्या घडीला पुरेसा भाव मिळावा यासाठी हवालदिल झालाय. कापसाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलनेदेखील केली जात आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक महाराष्ट्र सरकारने अखेर ऐकली, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी बातमी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 17, 2023 | 6:36 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अखेर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक ऐकली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी त्यावेळी दिलीय ज्यावेळी राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसाला शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मानलं जातं. पण या सोन्याला दृष्ट लागली की काय? अशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कापसाचा भाव सुरुवातीला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण हा भाव पुढे वाढण्याऐवजी अतिशय खाली आलाय.

कापसाचा भाव प्रतिक्विंटल अगदी साडेसात ते आठ हजारापर्यंत पोहोचला. त्यामुळे शेतकरी देखील चिंचेत पडले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कापूस घरात पडून आहे. आता भाव वाढेल, तेव्हा भाव वाढेल या आशेपयी शेतकरी वाट पाहत आहेत. याच आशेमुळे शेतकरी प्रचंड कर्जबाजारी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे घरात साठवून ठेवलेल्या या कापसामुळे घरातील इतरांना त्वचेचे विकार होण्याची वेळ आली. पण अद्यापही कापसाचे भाव वाढताना दिसत नाहीत. याउलट भाव खाली घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची हाक सरकार कधी ऐकल? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती सांगितली. खरंतर ते अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क विषयी सांगत होते. त्याचवेळी त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उल्लेख करत त्यांनाही दिलासा मिळेल, अशी माहिती दिली. “या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. त्यांनी महाराष्ट्रात अमरावतीत मेगा टेक्स्टाईल पार्कला मान्यता दिली. मागच्या काळात हा प्रस्ताव आम्ही पाठवला होता. आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती. आता टेक्स्टाईल पार्क मंजूर झालाय. मागच्या काळात आपण अमरावतीत टेक्स्टाईल पार्कची इको सिस्टिम आधीच तयार केली आहे. एक मोठा टेक्सटाईल झोन तयार केला आहे. अनेक कंपन्या तिथे आल्या आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“आता हा टेक्सस्टाईल पार्क आल्याने दहा हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख लोकांना थेट आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्षपणे असा तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समृद्धी येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा आपला कॉटन बेल्ट आहे. त्यामुळे हा पार्क आल्यानंतर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायादा मिळेल. खरं म्हणजे या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं फडणवीस म्हणाले.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल