Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | आदित्य ठाकरे यांच्या लग्नावरून भर सभागृहात फडणवीसांचा टोला

सभागृहात एका प्रश्नावरुन आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा निघाला. खुद्द फडणवीसांनीच हा विषय छेडल्यानंतर लग्नाची जबाबदारीही घेतो, असं फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. नेमकं काय घडलं

Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | आदित्य ठाकरे यांच्या लग्नावरून भर सभागृहात फडणवीसांचा टोला
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:47 PM

मुंबई : सभागृहात एका प्रश्नावरुन आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा निघाला. खुद्द फडणवीसांनीच हा विषय छेडल्यानंतर लग्नाची जबाबदारीही घेतो, असं फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. नेमकं काय घडलं सभागृहात पाहूयात.

सभागृहात कामगारांचा प्रश्न फडणवीसांनी मोठ्या चतुराईनं आदित्य ठाकरेंच्या लग्नाशी जोडला. अर्थात फडणवीसांचा टोन टीकेऐवजी फक्त विनोदाचा होता. मात्र त्यावरुन सभागृहात रंगलेला हशा चर्चेत आला. याची सुरुवात झाली बच्चू कडूंच्या प्रश्नानं मोठ-मोठे प्रकल्प उभे राहतात आणि नंतर ते बंद पडतात., हे थांबण्यासाठी एक धोरण असावं., अशी मागणी बच्चू कडूंनी केली. प्रश्नाचं गांभीर्य सरकारला कळावं म्हणून त्यांनी एका कामगाराचं उदाहरण दिलं. बच्चू कडू म्हटले की मिलमध्ये नोकरी आहे म्हणून लग्न जमलं. मात्र ती बंद पडल्यावर लग्नही मोडलं म्हणून सरकारनं या प्रश्नाकडे लक्ष घालावं.

उत्तर देण्यासाठी फडणवीस उभे राहिले, फडणवीसांनी उत्तराची सुरुवात मिश्किलपणे करत नंतर त्यावर सकारात्मक उत्तर दिलं. यानंतर आदित्य ठाकरे उभे राहिले आणि त्यांनी नाशिक भागातल्या राखेच्या ढिगाऱ्यांचा प्रश्न मांडला. त्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी बच्चू कडूंचा प्रश्नावर आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विषय छेडला आणि तिथून मग दोन्ही बाजूनं टोलेबाजी रंगली.

आदित्य ठाकरेंचं लग्न हा वैयक्तिक विषय असला तरी सभागृहातला मुद्दा उत्स्फुर्तपणे सुरु झाला. म्हणूनच कोणताही वाद न होता तो संपला सुद्धा मात्र काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन केलेलं विधान वादात आलं होतं.

एरव्ही राज ठाकरे टीकेवेळी खोचक बोलत असले, तरी ते कुणाच्या वैयक्तिकआयुष्यावर बोट ठेवत नाहीत. हल्ली महाराष्ट्रात राजकीय टीकेचा स्तर घसरल्याचीही तक्रार राज ठाकरे वारंवार करतात. मात्र मनसेचेच नेते प्रकाश महाजनांची टीका स्तर घसरवणारी नव्हती का.अशीही चर्चा तेव्ही होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.