‘संजय राऊत यांची विकृत मानसिकता’, ‘त्या’ फोटोवर देवेंद्र फडणवीस कडाडले

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे नवा वाद निर्माण झालाय. या फोटोवर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय.

'संजय राऊत यांची विकृत मानसिकता', 'त्या' फोटोवर देवेंद्र फडणवीस कडाडले
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 5:39 PM

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. संजय राऊत यांनी एका कॅसिनोचा फोटो ट्विट केलाय. फोटोतील कॅसिनो हे चीनच्या मकाऊ येथील असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. संजय राऊतांनी फोटोतील व्यक्तीचं नाव घेतलं नाही. पण फोटोतील व्यक्ती एक हिंदुत्ववादी नेता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वावनकुळे असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. त्यावर भाजपकडून अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण देण्यात आलं. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत”, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय. याशिवाय बावनकुळे यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं. आपण मकाऊच्या हॉटेलमध्ये कुटुंबासह थांबलो होतो, असं त्यांनी स्पष्ट केलंय. राऊतांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून झळकतेय. ते किती डिसपरेट झालेत, हे त्यातून लक्षात येतंय. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. बावनकुळे यांनी जिथे जेवण केलं तिथे रेस्टॉरंट आणि बाजूला कॅसिनो आहे. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केलाय. पूर्ण फोटो ट्विट केला त्यात स्पष्टपणे लक्षात येतंय, बावनकुळे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची मुलगी, नातू, त्यांचा परिवार आहे, सर्वजण त्यामध्ये दिसत आहेत. ही विकृत मानसिकता संपवली पाहिजे, बंद केली पाहिजे. इतकं फ्रस्टेशन योग्य नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘ही राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखंच’

“यापेक्षा आणखी काय वाईट परिस्थिती असू शकते? तुम्ही मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो, असे फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता, म्हणजे ही राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखंच आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण काय?

मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. पण त्यांच्या या स्पष्टीकरणवही संजय राऊतांनी टीका केलीय. आपल्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आहेत, असा दावा संजय राऊतांनी केलाय.

Non Stop LIVE Update
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.