ओबीस स्कॉलरशीपवर मी सभागृहात उत्तर देईन, देवेंद्र फडणवीसांनी सगळा हिशोबच मांडला…

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अजित पवार यांनी ओबीसी स्कॉलरशिप थकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

ओबीस स्कॉलरशीपवर मी सभागृहात उत्तर देईन, देवेंद्र फडणवीसांनी सगळा हिशोबच मांडला...
Devendra Fadnavis Ajit pawar
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 10:42 PM

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधकांकडून सरकारला विविध मु्द्यांवर घेरण्याचे काम सुरू होते. राज्याताली महागाई, रोजगार, शिक्षण, सीमावाद आणि मंत्र्यांची बेताल वक्तव्यावरून घेरण्याची भाषा विरोधकांकडून केली गेली. राज्य सरकारवर टीका करताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका करताना म्हटले आहे की, एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप या सरकारने थकवली असल्याची टीका केली होती.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर पलटवार करताना म्हणाले की, माहिती मागविल्यानंतर समजले की गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारनेच अडीचशे ते तीनशे कोटीची स्कॉलरशिप थकवल्याचा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शैक्षणिक स्कॉलरशिपवरून हे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अजित पवार यांनी ओबीसी स्कॉलरशिप थकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीनेच ही स्कॉलरशिप थकवली होती.

मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर बाराशे ते पंधराशे कोटींची तरतूद आम्ही केल्याची माहितीही त्यांनी सांगितली. ते म्हणाले की, माझ्यावर अजित पवार यांनी केलेल्या आरोपांचे उत्तर मी सभागृहात देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दलित, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा आता गाजणार असल्याचेही दिसून येत आहे. कारण या शिष्यवृत्तीची माहिती मी आता सभागृहात अजित पवार यांना देणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या सांगितले आहे. त्यामुळे ही स्कॉलरशिपच्या मुद्यावरून आता वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देतात याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.