धारावीत आणखी चौघांना कोरोनाची लागण, कोणत्या परिसरात किती रुग्ण?

धारावी परिसरात 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धारावीतील एका पुरुषाला आणि दोन महिलांची कोरोना टेस्ट (Dharavi Corona Patient) पॉझिटिव्ह आली आहे.

धारावीत आणखी चौघांना कोरोनाची लागण, कोणत्या परिसरात किती रुग्ण?
1 एप्रिल 2005 पासून 31मार्च 2020 अशी 15 वर्षाची खर्चाची माहिती त्यात आहे. 1 एप्रिल 2005 पासून 31 मार्च 2020 पर्यंत 31 कोटी 27 लाख 66 हजार 148 रूपये धारावी पुनर्विकास प्रकल्पावर खर्च करण्यात आले आहेत

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Dharavi Corona Patient) आहे. यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. आज (13 एप्रिल) धारावी परिसरात आणखी चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

धारावीतील एका पुरुषाला आणि दोन महिलांची कोरोना टेस्ट (Dharavi Corona Patient) पॉझिटिव्ह आली आहे. यातील एक महिला ही शुश्रूषा रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. तर सायन रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान आतापर्यंत धारावी परिसरात 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत कुठे किती रुग्ण?

परिसर – एकूण रुग्ण 

 • डॉ. बालिगा नगर – 5 (1 मृत्यू)
 • वैभव अपार्टमेंट – 2
 • मुकूंद नगर – 9
 • मदिना नगर – 2
 • धनवाडा चाळ – 1
 • मुस्लिम नगर – 5
 • सोशल नगर – 6 (1 मृत्यू)
 • जनता सोसायटी – 5
 • कल्याणवाडी – 2 (1 मृत्यू)
 • PMGP कॉलनी – 1
 • मुरगन चाळ – 1
 • राजीव गांधी चाळ – 1
 • शास्त्री नगर -4
 • नेहरु चाळ – 1  (1 मृत्यू)
 • इंदिरा चाळ – 1
 • गुलमोहर चाळ – 1

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1982 वर पोहचली आहे. काल (12 एप्रिल) कोरोनाच्या 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत उपचारानंतर 217 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 1298 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मुंबईत आत्तापर्यंतची सर्वाधिक 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 217 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Published On - 10:42 am, Mon, 13 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI