AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावीकरांना मोठी लॉटरी, 65 टक्के लोकांना मिळणार हक्काचं घर; तुम्ही पात्र आहात का?

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या मसुदा परिशिष्ट-२ मध्ये ५०७ निवासी गाळे आहेत. ३३२ गाळेधारक घरांसाठी पात्र ठरले आहेत, म्हणजे जवळपास ६५%. २०१ कुटुंबांना धारावीतच, तर १३१ कुटुंबांना बाहेर घर मिळेल. ३५ गाळेधारकांना कागदपत्रांच्या अभावामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे.

धारावीकरांना मोठी लॉटरी, 65 टक्के लोकांना मिळणार हक्काचं घर; तुम्ही पात्र आहात का?
| Updated on: Sep 04, 2025 | 8:52 PM
Share

धारावी पुनर्विकास प्रकल्पाने नुकताच त्यांच्या दुसऱ्या मसुदा परिशिष्ट-२ चा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, सरदार वल्लभभाई पटेल (SVP) नगरमधील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या भागात एकूण ५४६ सरंचनाचा समावेश आहे, ज्यापैकी ५०७ निवासी गाळे आहेत आणि त्यापैकी ३३२ गाळेधारक पुनर्विकास प्रकल्पांतर्गत घरांच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. याचाच अर्थ, जवळपास ६५ टक्के रहिवासी या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

पात्रता आणि अटी

या दुसऱ्या मसुद्यानुसार, २०१ कुटुंबांना धारावीमध्येच पुनर्वसनाचा लाभ मिळेल. तर उर्वरित १३१ गाळेधारकांना धारावीबाहेर घर दिले जाईल. ज्या गाळेधारकांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत, अशा ३५ गाळेधारकांना सध्या अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र, अंतिम परिशिष्ट-२ प्रकाशित होण्याआधी त्यांना सक्षम अधिकाऱ्याकडे आपली बाजू मांडण्याची संधी आहे. यानंतरही, ते DRP ने तयार केलेल्या चार-स्तरीय तक्रार निवारण यंत्रणेकडे अपील करू शकतात.

प्रकल्पाच्या अटींनुसार, १ जानेवारी २००० पूर्वीच्या सर्व निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक संरचनांना धारावीमध्येच घर मिळवण्याचा हक्क आहे. या पात्र रहिवाशांना ३५० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे दिली जातील. जी मुंबईतील इतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या तुलनेत १७ टक्के मोठी आहेत.

व्यावसायिक गाळेधारकांसाठी तरतुदी

व्यावसायिक आणि औद्योगिक गाळेधारकांना २२५ चौरस फुटांपर्यंतची जागा विनामूल्य मिळेल. यापेक्षा अधिक जागेची आवश्यकता असल्यास, ती जागा सरकार-निर्धारित बांधकाम दरांवर ‘टेलिस्कोपिक रिडक्शन’ (Telescopic Reduction) पद्धतीनुसार उपलब्ध करून दिली जाईल. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या कालावधीत बांधलेल्या तळमजल्यावरील गाळेधारकांना धारावीबाहेर २.५ लाख इतक्या नाममात्र किंमतीत ३०० चौरस फुटांचे घर मिळवण्याचा पर्याय आहे. याशिवाय, १ जानेवारी २०११ नंतर आणि १५ नोव्हेंबर २०२२ पूर्वी बांधलेल्या वरच्या मजल्यावरील गाळेधारकांना परवडणाऱ्या भाड्याच्या घराच्या योजनेअंतर्गत धारावीबाहेर ३०० चौरस फुटांचे घर मिळेल. या लाभार्थ्यांना १२ वर्षांसाठी भाडे दिल्यानंतर घराची मालकी मिळेल, किंवा ते कोणत्याही वेळी संपूर्ण रक्कम भरून आपल्या घराचे मालक बनू शकतात.

या अहवालात सार्वजनिक शौचालये (३६), धार्मिक स्थळे (२) आणि नागरी सुविधा संरचना (१) यांचाही समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि बेस्ट (BEST) यांसारख्या संस्थांकडून अद्याप या सार्वजनिक सुविधांच्या कागदपत्रांची पडताळणी बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परिशिष्ट-२ यादी अद्ययावत केली जाईल. दुसऱ्या मसुदा परिशिष्ट-२ चे प्रकाशन हे धारावीतील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर आणि सन्मानित जीवन मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. पुढील काळात कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर आणखी पात्र रहिवाशांचा या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.