Nana Patole : महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार : नाना पटोले

एक सदस्य नोंदणी करण्यास एक मिनीटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. 100 टक्के विश्वासाहार्य सदस्य नोंदणी असून निवडणूक आयोगाच्या डेटासोबत ही माहिती पडताळून पाहिली जाईल.

Nana Patole : महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार : नाना पटोले
तेजिंदर सिंग तिवानाची नाना पटोलेंविरोधात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 6:23 PM

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नसून हे अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह सदस्य नोंदणी अभियान आहे. हे अभियान यशस्वी करण्यात महाराष्ट्रातून मोठे योगदान देऊन देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

हे आधुनिक तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया देशात घातला त्याचे पुढले पाऊल म्हणजे हे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान आहे. मोबाईच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी होणार असून अत्यंत जलदगतीने होणार असून अत्यंत विश्वासार्ह आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

डिजीटल सदस्यता नोंदणी अभियानामुळे पक्ष संघटन मजबूत होणार

डिजीटल अभियानाचे प्रमुख राजू यांनी या अभियानाची माहिती देताना सांगितले की, डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान अत्यंत महत्वाचे असून यातून पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक बुथवर दोन स्वयंसेवक, एक महिला व एक पुरुष यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन ऍपच्या माध्यमातून ही सदस्यता नोंदणी केली जाणार आहे. सदस्य नोंदणी होताच त्या सदस्याला एसएमएस येईल आणि या सदस्यांना आयडी कार्डही देण्यात येणार आहे.

एका मिनिटात होणार सदस्य नोंदणी

डिजीटल सदस्यता अभियान कसे चालवले जाईल याची सविस्तर माहिती खा. ज्योतीमणी यांनी दिली. एक सदस्य नोंदणी करण्यास एक मिनीटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. 100 टक्के विश्वासाहार्य सदस्य नोंदणी असून निवडणूक आयोगाच्या डेटासोबत ही माहिती पडताळून पाहिली जाईल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे यांनी केले.

टिळक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख के. राजू, खा. ज्योतीमणी, प्रविण चक्रवर्ती, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सहप्रभारी सोनल पटेल, बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख, मोहन जोशी, संजय राठोड, चारुलता टोकस, उल्हास पवार, मुनाफ हकीम, भा. ई. नगराळे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान अहमद, प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, सरचिटणीस व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, आदी उपस्थित होते. (Digital membership registration drive launched through Congress Committee)

इतर बातम्या

‘आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे राज्याची आरोग्य आणि आर्थिक घडी बिघडली’, भाजपचा घणाघात

‘शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, पटोलेंची खोचक टीका

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.