मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण मराठीसाठी काहीच नाही, मेल्यावर साहेबांना काय सांगू? रावते उद्धव ठाकरेंवर भडकले

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलंय.

मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण मराठीसाठी काहीच नाही, मेल्यावर साहेबांना काय सांगू? रावते उद्धव ठाकरेंवर भडकले
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 11:26 PM

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलंय. सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी शब्दांच्या केल्या जाणाऱ्या वापराला दिवाकर रावते यांच्याकडून जोरदार विरोध झाला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक कानपिचक्या दिल्या. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठ मुद्द्यावर रावतेंनी सरकारला धारेवर धरत स्वपक्ष शिवसेनेलाही घरचा आहेर दिला. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत असल्याचं नमूद करत ते विधान परिषदेत चांगलेच भडकले (Divakar Rawate criticize Thackeray Government over Marathi language negligence in Assembly Budget ).

दिवाकर रावते म्हणाले, “सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी शब्दांचा वापर चुकीचा आहे. मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल एक शब्दही व्यक्त करण्यात आला नाही. याबद्दल मी खंत व्यक्त करतो.”

‘शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही हे दुर्दैव’

“मराठी ही राजभाषा असून त्याचा वापर प्रशासकीय कामकाजात वापरायला हवा. मुंबईतील बॉम्बे क्लबचं नाव आजही तेच आहे, बदललं जात नाही. मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन बांधले आहेत, पण मराठीचे भवन का नाही? शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही हे दुर्दैव आहे,” अशीही संतप्त भावना दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.

‘कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाही म्हणून संभाजी नगर नाही बोलायचं?’

“संभाजी नगर नाही बोलायचं कारण हे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाही असं बोलल्यावर शांत बसायचं. मराठी विद्यापीठाबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही. याबाबत मला बोलावं लागत आहे हे वाईट आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र अर्थसंकल्पात मराठीसाठी काहीच नाही. मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ?” असा सवाल दिवाकर रावते यांनी विचारलाय.

हेही वाचा :

मोठी बातमी : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, शिवसेना आमदारांना व्हिप जारी

भाजपला पुन्हा धक्का, दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

संसद आणि विधानसभेत महिलांना 50 टक्के आरक्षण द्या; शिवसेनेची मागणी

व्हिडीओ पाहा :

Divakar Rawate criticize Thackeray Government over Marathi language negligence in Assembly Budget

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.