AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या तरुणींनाही एसटीत नोकरी मिळणार, नियम आणि अटी इथे पाहा!

मुंबई: एसटी महामंडळामार्फत सध्या चालक आणि वाहक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये आता हलके वाहन चालविण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. […]

त्या तरुणींनाही एसटीत नोकरी मिळणार, नियम आणि अटी इथे पाहा!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

मुंबई: एसटी महामंडळामार्फत सध्या चालक आणि वाहक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये आता हलके वाहन चालविण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. याबरोबरच महिला उमेदवारांना शारिरीक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली आहे. ही अट किमान 160 सेंमीवरुन किमान 153 सेंमी करण्यात आली आहे. तसेच पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट शिथील करण्यात आली असून, 3 वर्षाऐवजी 1 वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करु शकणार आहेत.

एसटी महामंडळामार्फत राज्यात सध्या 8 हजार 22 इतक्या चालक तथा वाहन पदाची भरती सुरु आहे. यापैकी दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांमध्ये 4 हजार 416 तर उर्वरीत जिल्ह्यांमध्ये 3 हजार 606 इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत 8 फेब्रुवारी रोजी संपणार होती. इतर जिल्ह्यांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी 24 फेब्रुवारी रोजी संबंधित जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परिक्षा होणार आहे.

याबाबत दिवाकर रावते म्हणाले, “महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने नेहमीच आग्रहाची भूमिका घेतली आहे. महामंडळामार्फत नुकतीच 21 आदिवासी युवतींची बसचालक पदावर भरती करण्यात आली आहे. या युवतींचे सध्या प्रशिक्षण सुरु असून त्या लवकरच एसटीच्या बसेस चालवताना दिसतील. महामंडळातील नोकरीमुळे ग्रामीण भागातील होतकरु आणि गोरगरीब तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे. यामध्ये अनेक युवतीही एसटीच्या नोकरीसाठी पुढे येताना दिसत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करत आहे”

सध्या सुरु असलेल्या भरतीमध्ये महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी आजअखेर 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. महामंडळाने अधिकाधिक महिला उमेदवारांना या भरती प्रक्रियेत स्थान देण्याच्या उद्देशाने आज काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार हलके वाहन चालविण्याचा 1 वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. सध्या या पदासाठी महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. ही अट रद्द करण्यात आली आहे. परिक्षेअंती ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत 1 वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रितसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील, असं रावतेंनी सांगितलं.

अनुभवाची अटही शिथील चालक तथा वाहक पदासाठी पुरुष उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या अनुभवाच्या अटीमध्ये आता शिथिलता करण्यात आली आहे. त्यानुसार अवजड वाहन चालविण्याचा 1 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवारही या पदासाठी आता अर्ज करु शकतील, अशी घोषणाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

अवजड वाहन चालविण्याचा 3 वर्षाचा अनुभव असलेले पुरेसे उमेदवार मिळत नसल्याचे मागील भरती प्रक्रियेत दिसून आले होते. त्यामुळे ही अट शिथील करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.