वीज बिलाच्या वसुलीसाठी सक्ती नको, अन्यथा खळखट्ट्याक, डोंबिवली मनसेचा इशारा

वीज बिलाच्या वसुलीसाठी सक्ती नको, अन्यथा खळखट्ट्याक, डोंबिवली मनसेचा इशारा

वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी मनसेने सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

Nupur Chilkulwar

|

Nov 20, 2020 | 6:18 PM

कल्याण : वाढीव वीज बिल माफ (Electricity Bill) करण्यासाठी मनसेने सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे (Dombivali MNS). या संदर्भात डोंबिवली शहर प्रमुख राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवली वीज कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली (Dombivali MNS).

डोंबिवली हे शंभर टक्के वीज बिल भरणारे शहर आहे. सरकार बिलांसदर्भात जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत वीज कर्मचाऱ्यांनी बिलाच्या वसुलीकरिता लोकांच्या घरी जाऊ नये. वाद करायचा नाही. अन्यथा मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक केले जाईल, असा सज्‍जड दम यावेळी देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य शासनाच्यावतीने अवाजवी बिलांबाबत योग्य निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, नऊ महिने उलटले तरी राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंडळाकडून नागरिकांच्या विचारार्थ कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे नागरिक भरमसाठ बिलांच्या दबावाने त्रस्त आणि चिंताक्रांत झाले आहेत, असे मनसेने सांगितले. त्यामुळे मनसेकडून सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सरकारने लवकरात लवकर वाढीव बीज बिल माफी संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी केली गेली आहे.

आज डोंबिवली मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांच्या नेतृत्वात डोंबिवलीतील महावितरण कार्यालयात मनसेचे कार्यकर्ते महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. यादरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे की जोपर्यंत सरकार बिल संदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत महावितरणच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी लोकांच्या घरी जाऊ नये.

डोंबिवली हा शंभर टक्के बिल भरणारं शहर आहे. तरी लोकांना त्रास देऊ नये. आम्हाला वाद नको, नाहीतर मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल, असा इशाराही मनसेने दिला. यावेळी राजेश कदमांसोबत मनसे गटनेते मंदार हलबे, सागर जेधे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Dombivali MNS

संबंधित बातम्या :

भाजप सरकारच्या काळात ऊर्जा विभागाचं काम उत्तम, थकबाकी असेल तर गरिबांना सवलत दिल्यामुळे- फडणवीस

वीज ग्राहक आमचा देव; त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही : नितीन राऊत

आधी मागच्या सरकारच्या पापाचं निरसन करू; मगच 100 युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ: नितीन राऊत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें