AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चिमुकल्याला अलगद बाहेर काढले

मुंबईच्या डोंगरी परिसरात चार मजली इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या इमारत दुर्घटनेत बचाव कार्यात एका चिमुकल्याला जिवंत बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

VIDEO : चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चिमुकल्याला अलगद बाहेर काढले
| Updated on: Jul 16, 2019 | 3:59 PM
Share

मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरात चार मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींवर जवळच्या जे.जे आणि हबीब रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या इमारत दुर्घटनेत बचाव कार्यात एका चिमुकल्याला जिवंत बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

नेमकं काय घडलं?

सकाळी 11 च्या दरम्यान डोंगरी परिसरात तुरळक पाऊस सुरु होता. त्या ठिकाणी जोरात वारा वाहू लागला. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात सकाळी 11.40 च्या सुमारास डोंगरीतील तांडेल रोडवरील अब्दुल हमिद दर्गा परिसरातील केसरबाई इमारत कोसळली. इमारत कोसळल्यानंतर फार मोठा आवाज झाला. यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

त्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. तातडीने एनडीआरएफच्या टीम, अग्निशामक दलाला बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले.

बचावकार्यात अडथळा

डोंगरी भाग अत्यंत दाटीवाटीचा आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पालिकेची बचाव यंत्रणा बचावकार्य करण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच एनडीआरएफच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. घटना घडल्यानंतर तब्बल दीड तासाने एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतले.

म्हाडाची इमारत

दरम्यान डोंगरी परिसरातील इमारत म्हाडाची होती. या इमारतीत जवळपास 15 कुटुंब राहात होते, अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने मुंबईत आज पाऊस पडत नाही, त्यामुळे बचावकार्य वेगाने सुरु आहे. बचावकार्यादरम्यान अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून तातडीने जवळच्या नायर आणि हबीब रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ढिगाऱ्याखाली चिमुकला जिवंत

इमारत कोसळल्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 40 हून जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्य सुरु असताना प्रशासनाने एका चिमुकल्याला जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्याला बाहेर काढल्यानंतर तातडीने उपचारासाठी जवळच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अद्याप या ठिकाणी बचावकार्य वेगाने सुरु आहे.

मृत झालेल्या व्यक्तींची नावे :

  • शबीया निसार शेख – (महिला 25) – जे. जे. रुग्णालय
  • अब्दुल सत्तार कल्लू शेख – (पुरुष 55) – हबीब रुग्णालय
  • अज्ञात व्यक्ती (पुरुष 15) हबीब रुग्णालय

जखमींची नावे : 

  • फिरोज निसार सलमानी (पुरुष 45) – जे. जे. रुग्णालय
  • आईशा शेख (3 वर्ष मुलगी) – जे. जे. रुग्णालय
  • सलमा अब्दुल सत्तार शेख (पुरुष 55) – जे. जे. रुग्णालय
  • अब्दुल रेहमान ( 3 वर्षीय मुलगा) – जे. जे. रुग्णालय
  • नवेद सलमानी (पुरुष 35) – जे. जे. रुग्णालय
  • इमरान हुसेन कलवानीया (पुरुष 30)- जे. जे. रुग्णालय
  • जावेद ( पुरुष 30) – जे. जे. रुग्णालय
  • जीनत ( महिला 25) – जे. जे. रुग्णालय

संबंधित बातम्या : 

LIVE : डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली, 12 जणांचा मृत्यू, जवळपास 50 जण अडकले

फोटो : मुंबईतील डोंगरीत 4 मजली म्हाडाची इमारत कोसळली

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.