AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा धिंगाणा; दारु पिऊन, अर्धनग्न अवस्थेत मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेनं एक व्हिडीओ पोस्ट करत मनसे नेते जावेद शेख यांच्या मुलावर आरोप केला आहे. मद्यपान करून गाडी चालवली आणि अपशब्दही वापरले, असा आरोप तिने केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा धिंगाणा; दारु पिऊन, अर्धनग्न अवस्थेत मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ
Rahil Shaikh and Rajshree MoreImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 07, 2025 | 12:00 PM
Share

अभिनेत्री राखी सावंतची जवळची मैत्रीण म्ङणून ओळखली जाणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे नुकत्याच एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात ही घटना घडली आहे. रविवारी रात्री राजश्रीच्या गाडीचा अपघात झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख मद्यपान करून गाडी चालवत होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेनंतर राजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत तिच्यावर आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसून येत आहे. यामध्ये तो तिला धमकी देतानाही दिसतोय. “xxx पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग.. मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल”, अशी धमकी त्याने राजश्रीला दिली.

संबंधित व्हिडीओमध्ये तो घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशीही वाद घालताना दिसतोय. तो पोलिसांना सहकार्य करण्यास नकार देतो आणि त्यांच्याशी आक्रमकपणे वागतो. याप्रकरणी राजश्रीने राहिलविरोधात एफआयआर दाखल केली असून त्याची कॉपीसुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. राहिल दारुच्या नशेत गाडी चालवर होता आणि वडिलांच्या राजकीय पदावरून धमकी देत होता, असा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर एफआयआर दाखल केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सतत धमक्या मिळत असल्याचं तिने म्हटलंय. राजश्रीने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

याआधीही राजश्री तिच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. महाराष्ट्रात मराठी भाषेत बोललं पाहिजे, या मनसेच्या आग्रहावर तिने संताप व्यक्त केला होता. इतरांवर भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी अधिक मेहनत करावी, असं तिने म्हटलं होतं. स्थलांतरितांशिवाय मुंबईतील स्थानिक मराठी लोकांची स्थिती आणखी बिकट होईल, असा दावाही तिने केला. तिच्या या वादग्रस्त विधानानंतर, वर्सोवा इथल्या मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर राजश्रीने जाहीर माफी मागितली आणि तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तो व्हिडीओ काढून टाकला.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.