Dussehra Melava 2023 : तोफ धडाडणार, भाषणं गाजणार; ‘या’ चार दसरा मेळाव्यांमधील भाषणांकडे महाराष्ट्राच्या नजरा

Dussehra Melava 2023 : दसरा मेळाव्यातील भाषणांकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना हे नेते भाषणात काय बोलणार? कोणते मुद्दे मांडणार याकडे राज्याच्या नजरा आहेत.

Dussehra Melava 2023 : तोफ धडाडणार, भाषणं गाजणार; 'या' चार दसरा मेळाव्यांमधील भाषणांकडे महाराष्ट्राच्या नजरा
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 9:29 AM

मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : आज दसऱ्याचा सण आहे आणि दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची परंपरा आहे. दसरा मेळावा म्हणजे धडाकेबाज भाषणं…  यंदा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. फूट पडल्यापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. तसंच परळीतील भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर नागपुरात विजयादशमी उत्सव साजरा होतोय. तिथं सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करत आहेत.

ठाकरेंची तोफ धडाडणार

दादरमधील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची झलक आजच्या सामना अग्रलेखातून पाहायला मिळाली. अहंकाराचा नाश होईल, असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण चर्चिलं जाणार, असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवाजी पार्कमधील या सभेचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आपलं शिवतीर्थ सजतंय, तुमच्या स्वागतासाठी!, असं म्हणत हा टीझर ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे काय बोलणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर हा पहिला दसरा मेळावा होतोय. आझाद मैदानावरील सभेच्या तयारीचा एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिमगा मेळावा ठरेल, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. त्यामुळे आजच्या सभेत एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल.

पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे लक्ष

परळीतील भगवान भक्ती गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच पंकजा यांनी नुकतंच शिवशक्ती परिक्रमा यात्रा केली. यावेळी त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतोय. या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे महाराष्ट्रावचं लक्ष आहे.

RSS चा विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज विजयादशमी उत्सव पार पडतोय. काही वेळाआधी विजयादशमीनिमित्त पथसंचलन पार पडलं. यात सरसंघचालक मोहन भागवत हे संबोधित करत आहे. G-20 वर भाष्य केलं. G-20 चा विचार आता मानव केंद्रीत झाला आहे. भारताने या परिषदेचं यजमानपद भूषवलं ही अभिमानास्पद बाब आहे, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.