अनिल देशमुखांप्रकरणी ईडीला अनेक पुरावे दिले; अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा चार तास जबाब नोंदवला

अनिल देशमुख प्रकरणी ईडीने आज अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा ईडीने जबाब नोंदवला आहे. (ED has recorded Adv Jayashree Patil statement in anil deshmukh case)

अनिल देशमुखांप्रकरणी ईडीला अनेक पुरावे दिले; अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा चार तास जबाब नोंदवला
Adv Jayashree Patil
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 4:35 PM

मुंबई: अनिल देशमुख प्रकरणी ईडीने आज अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा ईडीने जबाब नोंदवला आहे. सुमारे चार तास जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी त्यांनी ईडीला अनेक पुरावे दिले आहेत. तसेच ईडीच्या सर्व प्रश्नांचीही उत्तरे दिल्याचा दावा जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांनी ईडीला नेमके कोणते पुरावे दिले? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (ED has recorded Adv Jayashree Patil statement in anil deshmukh case)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणी जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

वसुली झालेल्यांची नावे दिली

याप्रकरणी आज ईडीने जयश्री पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार पाटील या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात आल्या. यावेळी सुमारे चार तास त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मला ईडीने प्रश्न उत्तर स्वरुपात माहिती विचारली. ईडीच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. त्यांना अनेक पुरावे दिले आहेत. ज्या लोकांकडून पैसे गोळा केले जात होते, त्यांची माहिती दिली आहे, असं पाटील म्हणाल्या.

जबाब पूर्ण झाला नाही

आज चार तास माझा जबाब नोंदवण्यात आला. परंतु, माझा जबाब आज पूर्ण झालेला नाही. मला पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं जाणार आहे. जेव्हा बोलावलं जाईल, तेव्हा मी पुन्हा ईडीच्या कार्यालयात जाऊन ईडीला सहकार्य करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोण आहेत जयश्री पाटील?

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत . जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत (ED has recorded Adv Jayashree Patil statement in anil deshmukh case)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

Param Bir Singh Anil Deshmukh Live Updates | परमबीर सिंग यांच्या अनिल देशमुख यांच्या विरोधीतील याचिकेवर मुंबई हायकोर्टात काय घडलं?

(ED has recorded Adv Jayashree Patil statement in anil deshmukh case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.