AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस : सूत्र

ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती आहे. | ED notice to Vishwajeet Kadam Wife Swapnali kadam

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस : सूत्र
Vishajeet kadam And Swapnali Kadam
| Updated on: Jan 28, 2021 | 11:45 AM
Share

मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती आहे. आज सकाळी 11.30 वाजता त्या ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (ED notice to Vishwajeet Kadam wife Swapnali kadam)

ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यानुसार त्या आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात जाऊ शकतात. स्वप्नाली यांचे वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी स्वप्नाली यांची चौकशी होणार आहेत.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर काँग्रेसही असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठवली होती. तसंच ईडीने त्यांची प्राथमिक चौकशीही केली आहे.

राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार

राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार दिलेला आहे. यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं स्पष्ट करत सध्या यावर मी बोलणार नसल्याचं विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं.

कोण आहेत स्वप्नाली कदम …?

ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या स्वप्नाली या पत्नी आहेत तसंच काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सूनबाई आहेत.. तसंच पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या त्या मुलगी आहेत.

अविनाश भोसले यांची याअगोदर ईडीकडून चौकशी

अविनाश भोसले यांची 27 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीने सुमारे दहा सात चौकशी केली. FEMA कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली होती. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.

कोण आहेत अविनाश भोसले?

  • अविनाश भोसले यांना ओळखणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते 80च्या दशकात रिक्षा चालवत होते.
  • त्यानंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
  • आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते.

बाणेरमध्ये व्हाईट हाऊस

  • पुण्याच्या बाणेर येथे भोसले यांचा पॅलेस आहे. व्हाईट हाऊस असं त्याचं नाव आहे.
  • सफेद रंगाच्या या पॅलेसचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखाच आहे.

कन्येच्या लग्नाला सेलिब्रिटींची मांदियाळी

  • अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली हिचा विवाह माजी मंत्री, दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याबरोबर झाला होता.
  • पुण्यातील सर्वात रॉयल विवाह सोहळा म्हणून हा विवाह सोहळा ओळखला जातो.
  • या विवाहाला अभिनेता सलमान खान यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्रीही आले होते.

हे ही वाचा :

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.