AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: EDच्या पथकाची कुर्ला येथे छापेमारी, नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढणार?

ईडीच्य़ा अधिकाऱ्यांच्या एका पथकाने कुर्ल्यात छापेमारी सुरू केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक आज सकाळीच कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडजवळ पोहोचंल आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका वयस्क व्यक्तींकडील कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.

VIDEO: EDच्या पथकाची कुर्ला येथे छापेमारी, नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढणार?
EDच्या पथकाची कुर्ला येथे छापेमारी, नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढणार? Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 11:21 AM
Share

मुंबई: ईडीच्य़ा अधिकाऱ्यांच्या एका पथकाने कुर्ल्यात छापेमारी सुरू केली आहे. ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांचं एक पथक आज सकाळीच कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडजवळ पोहोचंल आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका वयस्क व्यक्तींकडील कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. गोवा कंपाऊंड जवळच्या भूखंडाप्रकरणीच राष्ट्रवादीचे (ncp) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक प्रकरणाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठीच ईडीने ही छापेमारी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईडीच्या हाती काय माहिती लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतलेलं असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे आजच्या या छापेमारीमुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सकाळीच ईडीच्या 8 ते 9 अधिकाऱ्यांच्या पथकाने कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड जवळ जाऊन छापेमारी सुरू केली. या टीममध्ये एक महिला अधिकारीही होती. यावेळी सीआरपीएफ जवानांचा मोठा फौजफाटाही होता. गोवावाला कंपाऊंड जवळ एका वयस्क व्यक्तीजवळ उभं राहून ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांची छाननी करत होते. कुठल्या तरी मालमत्तेशी संबंधित ही कागदपत्रे असल्याचं दिसत होतं. तसेच या व्यक्तीकडून ईडीचे अधिकारी बरीच माहिती घेत होते. या व्यक्तिला काही प्रश्न विचारून ईडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. ईडीचे अधिकारी या व्यक्तीला भेटायला आले यावरून या व्यक्तिनेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावल्याचं दिसून येत होतं.

कसून तपास सुरू

डी गँगशी संबंधित व्यक्तीकडून नवाब मलिक यांनी भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. या गोवावाला कंपाऊंडच्या बाजूलाच हा भूखंड आहे. त्यामुळे अधिकारी या ठिकाणी पोहोचल्याने मलिकांशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत अधिक वाढ होऊ शकते, असंही बोललं जात आहे.

मलिकांच्या कोठडीत वाढ

दरम्यान, नवाब मलिकांच्याअडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिकांची कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असून मलिकांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. कोठडी वाढल्याने नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. नवाब मलिक यांच्या विनंतीवरून त्यांना काही वस्तू वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिक अटकेत आहेत. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली होती. 7 मार्चला त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांना तुरुंगात बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची देण्यास मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पाठदुखी व इतर व्याधींचा त्रास होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता मलिक यांनी कोर्टाकडे बेड, खुर्चीची मागणी केली होती.

संबंधित बातम्या:

Gayathri Accident: मैत्रिणींसोबतची होळी ठरली शेवटची; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अवघ्या 26 वर्षी अपघातात मृत्यू

Maharashtra News Live Update : आयकर विभागाची देशभर छापेमारी, हिरानंदानी ग्रुपवर छापे

Video – Nagpur | राष्ट्रवादीचे नेते हे संजय राऊत यांना भेटणार, महाविकास आघाडीतील गटबाजी संपवण्याचे आवाहन

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.