Maharashtra News Live Update : राजकारणाचा पारा वाढला, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई

| Updated on: Mar 22, 2022 | 10:59 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : राजकारणाचा पारा वाढला, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज मंगळवार 22 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मोहित कंबोज यांच्या खुशी पॅराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे अशी पालिकेला शंका आहे. 23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीची पाहणी करण्यासाठी येतील असा उल्लेख नोटीशीत करण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Mar 2022 06:32 PM (IST)

    कोरोनाच्या चौथ्या लाटेचा शक्यता

    – पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती,

    – चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका सज्ज,

    – ऑक्सिजनचा पुरवठा बेड्सची उपलब्धता सज्ज असल्याची माहिती,

    – नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन

  • 22 Mar 2022 06:28 PM (IST)

    निलेश राणेंचा पार्थ पवारांवर घणाघात

  • 22 Mar 2022 06:21 PM (IST)

    तरुणांचा दुसऱ्या गटातील तरुणांशी वादाचे प्रकरण

    अमरावतीच्या परतवाडा येथे काश्मीर फाईल चित्रपट पाहून आलेल्या तरुणांचा दुसऱ्या गटातील तरुणांशी वादाचे प्रकरण....

    जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या तरुणांची भाजप नेते अनिल बोंडें यांनी घेतली भेट...

    नारे लावण्या वरुन रविवारी रात्री १२ वाजता दोन गटात झाला होता मोठा राडा...

    १५ जनाला पोलीसांनी घेतले होते ताब्यात...

    परतवाडा शहरात जिथे घटना घडली तिथे पोलिस बंदोबस्त आहे तैनात...

  • 22 Mar 2022 04:56 PM (IST)

    संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांची टीका

    त्यांनी कधीही विणडणूक लढवली नाही

    आमचा युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही.

    संजय राऊत काय म्हणाले याला महत्व नाही

    संजय राऊत जे बोलतायत त्याचा परिणाम त्यानं निवडणुकीत दिसेल

    St संप संपला नाही तर, एक।लाख कुटुंब उध्वस्त होतील

    सातवा वेतन आयोग देणं याबाबत यात काही उपाय निघाला पाहिजे

    ग्रामीण भागात लोकांचे हाल होत आहेत

    चार महिने संप सुरू आहे, यावर सकारात्मक मार्ग काढला गेला पाहिजे

    विलीनीकरण म्हणजे सरकारी कर्माच्यानं मिळणाऱ्या सुविधा असतात. चांगला पगरवाढीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडे नेला तर कर्मचारी नक्की एक पाऊल मागे जातील.

    शिवसेनाला सर्व सोडायला लागणार

    कोल्हापूर मध्ये सात पैकी 5 वेळा शिवसेनाला आमदार झाला ती जागा काँग्रेसला सोडावी लागली

    सतेज पाटील यांच्या कामाची पद्धत सर्व घ्यायची अशी आहे. त्यामुळे कोल्हापूर काय, मावळ काय सर्व द्यावे लागेल

  • 22 Mar 2022 04:54 PM (IST)

    अंबरनाथमध्ये लिफ्ट दुसऱ्या माळ्यावरून कोसळली

    लिफ्टमधील सात महिला जखमी, दोघींचे पाय मोडले

    ओव्हरलोड झाल्यानं लिफ्ट कोसळल्याची माहिती

  • 22 Mar 2022 03:29 PM (IST)

    गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

    परिवहन मंत्री धाडी पडल्यामुळे बीझी आहेत. अनिल परब शंभर एकरात बीझी आहेत. ते त्यांच्या फ्लॅटसमध्ये बीझी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने कारवाई न करण्यास सांगितलं. आजा सरकार खोट बोललं. सभापती निंबाळकर यांनी समिती स्थापन केली होती. त्यात सर्व पक्षाचे सदस्य होते. तरी सरकार महिती नसल्यासारखे बोलले. न्यायालयाने उद्यापर्यंत समिती असल्यास सांगण्यास सांगितले आहे.

    एक महत्वाची बाब तुम्हाला सांगतो. क्रिमिनल अॅक्टखाली आत्महत्येबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले. आम्ही न्यायलयाला न रागावण्याची विनंती. तुम्ही रागावला तर आत्महत्या वाढतली. मग न्यायलय स्तब्ध झालं. आज पुन्हा क्रांतिकारी घडलं. मात्र सरकारची समिती सांगण्याचीही हिंमत नाही. हे कोणतं हिंदुत्व?

  • 22 Mar 2022 03:23 PM (IST)

    प्रवीण दरेकर Live

    या सरफेसी अॅक्सटचा दुरोपयोग गेला

    कारखान्यांना सरकार कशी मदत करतं

    कारखान्यांचा दिलेल्या कर्जात 4 हजार 100 कोटी वसुलीला पात्र

    लोकांच्या करांचे पैसे कर्ज देऊन बुडवले

  • 22 Mar 2022 03:21 PM (IST)

    प्रवीण दरेकर Live

    प्रवीण दरेकरांनी कारखान्यांची यादी वाचली

    साखर कारख्यांच्या माध्यमातून कर्ज बुडवली

    बँकेचे साखर कारखान्यांकडून येणारी येणी एकूण कर्जाच्या 40 टक्के होती

  • 22 Mar 2022 03:21 PM (IST)

    प्रवीण दरेकर Live

    शिखर बँकेच्या चौकशीचे आदेश दिली आहे

    या चौकशीत आमच्यावर  भत्ता घेतल्याचा आरोप

    तारणही घेतलं नाही, त्याला आम्ही कसं कोट्यावधींचं कर्ज देऊ

  • 22 Mar 2022 03:18 PM (IST)

    प्रवीण दरेकर Live

    ही कारवाई फक्त आमच्यावर

    ही कारवाई चुकीची

    सहकार क्षेत्रात यांनी चोऱ्या केल्या

    फळं येणाऱ्या झाडाला दगडं मारतात

    मला याचं काय वावडं नाही

    साखर कारखान्यांचं, पतसंस्थांचं वाटोळं पुढाऱ्यांनी केलं

  • 22 Mar 2022 03:11 PM (IST)

    सोलापुरातील कापड मार्केट असलेल्या चाटी गल्लीत भीषण आग

    - चाटी गल्लीतील अब्दुलपूरकर यांच्या घराला लागली भीषण आग

    - आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग मोठ्याप्रमाणात भडकली

    - अतिशय दाट लोकवस्तीत लागली भीषण आग

    - रस्ता छोटा असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यासाठी अडथळा

    - शेजारीच कापड मार्केट असल्याने परिसरात भितीचे वातावरण

  • 22 Mar 2022 03:10 PM (IST)

    कामगारांचा वायुमुळे गुदमरून मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती येथे गटार लाईन स्वच्छता करताना 2 कामगारांचा वायुमुळे गुदमरून मृत्यू,

    सास्ती येथील वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा कामगार वसाहत परिसरातील घटना,

    आज सकाळी 8 ते 10 फूट खोल गटर स्वच्छतेसाठी उतरले होते कामगार, राजू जर्जुला आणि रामजी खंडारकर अशी मृतकांची नावे,

    सुशील कोरडे नामक अन्य बाधित कामगाराला तातडीने नागपुरात हलविले, आणखी 2 कामगारांना वायूची किरकोळ बाधा-चंद्रपुरात केले जात आहेत उपचार,

    वेकोली प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल, घटनेची चौकशी सुरू

  • 22 Mar 2022 03:05 PM (IST)

    शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर

    जिल्ह्यात शिवसपर्क अभियानापूर्वी शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर

    - वर्धेच्या स्थानिक विश्राम गृहात शिवसेना संपर्क प्रमुख आणि जिल्हाप्रमुख बसले असता तोडफोड

    - शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी तोडफोड केल्याची माहिती

    - विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुख यांच्यासोबत बचबाची

    - मुंबई येथील शिवसपर्क अभियान साठी आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही हल्ला

    - विश्रामगृहच्या कावेरी या खोलीत जाऊन केली टेबलाची तोडफोड

    - आजपासून शिवसपर्क अभियान

    - आज दुपारी पाच वाजता खासदार कृपाल तुमाने येणार आहे दौऱ्यावर

    - दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी आले असता वाद

    - मागील काही दिवसापासून सुरु आहे जिल्ह्याच्या शिवसेनेत वाद

  • 22 Mar 2022 02:13 PM (IST)

    भुईमूगाच्या शेतात सापडली 405 गांजाची झाड

    अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथील भुईमूगाच्या शेतात सापडली 405 गांजाची झाडं....

    गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनही शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती केली....

    याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलिसांनी शेतामध्ये छापा टाकला असता...

    शेतकऱ्याकडून तब्बल 65 किलो गांजा पकडला असून... गांजाची 405 झाडे ताब्यात घेत तब्बल 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे....

  • 22 Mar 2022 02:12 PM (IST)

    अखिलेश यादव यांचा खासदारकीचा राजीनामा

    लोकसभा सदस्यत्वाचा दिला राजीनामा

    उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यांचा विजय

    करहल मधून आमदारपदी विजय

  • 22 Mar 2022 02:04 PM (IST)

    रोज एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत - प्रवीण दरेकर

    रोज एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत.

    सभापतीचीआदेश दिले बैठक झाली १८ पैकी १६ प्रश्न मान्य झाले

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून चर्चा करू असे सांगण्यत आले

    रोज आत्महत्या होत आहेत. आज तीन कर्मार्यांनी आत्महत्या केली याकडे सभागृहाचे लक्ष वेधून

    आजच्या आज कॅबनेटची बैटक घेऊन निर्णय घ्यावा असे आम्ही मत मांडले

    त्यावर परिवहन मंत्री यानी आश्वासन दिले आहे

    आज उद्या याबाबत निर्णय घेतीसल अशी अपेक्षा आहे.

  • 22 Mar 2022 01:45 PM (IST)

    माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

    - माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

    - बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात पार पडतोय शेतकरी मेळावा

    - धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केला मेळावा

    - शेतकरी मेळाव्यासोबतच विविध विकास कामाचे उद्घाटन आणि गुणवंतांचा होणार सत्कार

  • 22 Mar 2022 01:44 PM (IST)

    राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेस मधील पाण्याचं कनेक्शन तोडलं

    राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेस मधील पाण्याचं कनेक्शन तोडलं

    पाणीपट्टी भरली नाही म्हणून महापालिकेने आगाखान पॅलेसच पाणी कनेक्शन तोडलं

    मागील पाच वर्षांच 1 कोटी 71 लाख रुपयांची पाणीपट्टी थकली

    पाणी कनेक्शन तोडल्याने आगाखान पॅलेस मधली सर्व झाड सुकली

    पाणी कनेक्शन सुरु करण्यासाठी ऍड. सुनील करपे हायकोर्टात याचिका दाखल करणार

  • 22 Mar 2022 01:13 PM (IST)

    मुंबई हायकोर्टाची मुंबई महापालिकेला चपराक - नितेश राणे

    मुंबई हायकोर्टाची मुंबई महापालिकेला चपराक - नितेश राणे

    इक्बाल सिंह चहल यांचं मोबाईल चेक करण गरजेच

    राज्यात कोणता प्रश्न उरलेला नाही

    फक्त तीन घरांच्या लोकांमध्ये काय चाललंय याकडे सरकारचं लक्ष

    संजय राऊत चमकोगिरी करतात

    महाराष्ट्र सरकारविरोधात बोलेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाते

    राणे, मोहित कंबोल, किरीट सोमय्या यांच्यावर फक्त कारवाई

  • 22 Mar 2022 12:31 PM (IST)

    केंद्रीय तपास यंत्रणेपेक्षा महाराष्ट्र पोलीस चांगला तपास करणार

    - महाराष्ट्र पोलिस काम करायला लागले. अनेक नेते जेलमध्ये जाणार. त्याचे पुरावे घेणार. पण त्यांची नावं घेणार नाही.

    - केंद्रीय तपास यंत्रणेपेक्षा महाराष्ट्र पोलीस चांगला तपास करणार

    - चित्रपट काढल्याने पीओके भारतात येणार नाही, की कश्मिरी पंडीतांना घरं मिळणार नाही. त्याचं पुनर्वसन होणार नाही

    - भविष्यात सेना भाजप एकत्र येणार नाही. एखादी भुमिका सेनेनं घेतली त्यावरून सेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं २५ वर्ष एकत्र काम केलं ते विसरुन भाजप सुडानं वागतेय. त्यामुळे एकत्र येण शक्य नाही

    - आमचा कागदपत्रांवर विश्वास आहे. पेन ड्राईव्ह वैगेरे डिजीटल नागपूरचं आहे

    - माझा आणि फडणवीसांचा इंटरव्यू सुरु आहे

    - नितीन गडकरी सर्वांचे प्रिय आहे. फडणवीस पण सर्वांचे प्रिय आहे

    - पंजाबमध्ये पंतप्रधान प्रचाराला गेले पण भाजप हारली

    - फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहे. त्यांना नागपूरात मर्यादीत करु नका

  • 22 Mar 2022 12:28 PM (IST)

    पेनड्राईव्ह हे नागपूरचं डिजीटल प्रकरण आहे - संजय राऊत

    पेनड्राईव्ह हे नागपूरचं डिजीटल प्रकरण आहे

    आरोप कोणावरही सिध्द झालेले नाहीत

    शिवसेनेचं काम इथं जोमाने सुरू करतोय

    जे होत त्यांना मिळालं

    पंजाब जिंकलं असतं तर त्याना जिंकलं असं म्हणलं असतं

  • 22 Mar 2022 12:18 PM (IST)

    MIM शी आघाडी होणार नाही, हे सांगणारा पहिला माणूस मी - संजय राऊत

    - जीना यांनी एक फाळणी केली तुम्ही रोज फाळणी करता

    - MIM शी आघाडी होणार नाही, हे सांगणारा पहिला माणूस मी.

    - MIM ने युपी

    - संघ भाजपचा मार्गदर्शक आहे, मग आमचे मार्गदर्शक का नाही?

    - आम्ही मोहन भागवत यांना भेटणार

    - जलयुक्त शिवारची चौकशी मुख्यमंत्री करतायत

    - कॅामन मिनीमन कार्यक्रमावर राज्यात सरकार बनली. कुणीही आपला पक्ष इतर पक्षात विलीन केली नाही. शिवसेना हिंदूत्ववादी पक्ष आहे

    - महाविकास आघाडीने एकत्र मनपा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. पण तसं झाले नाही. तर

    - भाजपचा भगवा आहे की नाही, भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे. भाजपचा आहे की नाही माहित नाही.

    - फडणवीस भाजपचे मोठे नेते, स्वबळावर लढण्याबाबत ते निर्णय घेऊ शकतो

    - मावळचे आप्पा भारणे आहे तेच राहतील. पार्थ पवार तरुण आहे त्यांचा विचार त्यांचा पक्ष करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर त्यावर बोलू Imp - नवाब मलीक यांचा राजीनामा घेणार नाही. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चुक होती.

    - अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं घाई घाईत निर्णय झाला. थोडं संयमाने घ्यायला हवं होत

  • 22 Mar 2022 12:15 PM (IST)

    मोहन भागवंताची विधानं पाहा - संजय राऊत

    मोहन भागवंताची विधानं पाहा

    मुस्लीम आणि हिंदू डीएनए सारखा आहे

    ज्यांना असं वाटतं की मुस्लीमांनी इथं राहू ते भारतीय असू शकत नाही

    कोट्यावधी मुस्लमान इथं राहतात

    जनाबसेना म्हणायचं आहे

    मिया खान मौलाना म्हणायचं का

    मी पहिला माणूस ज्याने सांगितलं की युती शक्य नाही

    शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपाचं नाट्य

    शिवसेना एक हिंदू्त्ववादी पार्टी आहे आणि राहणार

    देवेंद्र फडणवीसांचा घोटाळा उघड करू

    एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात भूमिका मांडतो

    आमच्याकडे काय प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर विचार करू

  • 22 Mar 2022 12:06 PM (IST)

    संघटन ही खरी शिवसेनेची ताकद आहे - संजय राऊत

    संघटन ही खरी शिवसेनेची ताकद आहे - संजय राऊत

    पुन्हा एकदा शिवसेना नागपूरात ताकतीने उभी राहणार

    इतर निवडणुकीत लक्ष घालाव यासाठी आम्ही आलोय

    पक्ष वाढवण्यासाठी इथे आलोय

    भावना गवळी आम्हालाही दिसत नाही

    भवना गवळी रितसर परवानगी घेतली आहे.

    विदर्भ मराठ्यातून शिवसेनेन झेप घ्यावी

    युती असताना सुध्दा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा कोल्हापुरात पराभव

    आज मी दिवसभरात अनेक नेत्यांना भेटणार आहे

    मला सुध्दा ईडीचं भय दाखवण्यात आलं

    ममता बॅनर्जी यांच्या भाच्याला सुध्दा ईडीने दिल्लीत बोलावलं

    राजकीय षडयंत्र

    राष्ट्रीय यंत्रणा सत्ता म्हणेल तसं वागत आहेत.

  • 22 Mar 2022 11:46 AM (IST)

    १४ दिवसांत एकरकमी पैसे द्या - गोपीचंद पडळकर

    - राज्यातील शेतकरी कोरोनात हवालदील, व्याजाने पिक घेतला, कारखान्याला पिक दिला एकरकमी एफआरपी दिली गेली नाही, राज्य केंद्राकडे बोट दाखवत आहेत… कणताही निर्णय केंद्राचा नाही.. निर्णय राज्याचा , पण बोंब केंद्राच्या नावाने..

    - १४ दिवसांत एकरकमी पैसे द्या… स्वस्तात पिक आणत आहे, सगळ्या कारखान्यांची बैठक घ्या… निर्णय घ्या…

    - ऊसाची मोळी मुख्यमंत्री, सहकारमंत्र्यांना देणार… घात करू नका, हक्काचे पैसे द्या…

    - एसटी कामगारांबद्दल सदाभाऊंनी परिषदेत मुद्दा ऊपस्थित केला, बैठकीचा हवाला दिला, परिवहन मंत्री म्हणाले निवेदन करू पण निवेदन केलं नाही… आज बैठक होईल निरेणय होईल असं म्हणत आहेत…

  • 22 Mar 2022 11:44 AM (IST)

    पाच राज्याच्या निवडणुकांवेळी भाव का वाढले नाहीत - नाना पटोले

    - कुठलीही वीज तोडणी नाही, शेतकर्यांना जो शब्द दिला त्याचं पालन होत आहे…

    - एचके पाटील आले आहेत, आज मविआचं जे कामकाज सुरू आहे त्याचा आढावा घेतला जाईल, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत चर्चा होईल..

    - डीजेल, पेट्रोलचे जे दर वाढले ते राज्य सरकारने वाढवले नाहीत, भाजप खेटारडा पक्ष, खोटं बोलून सत्ता हासील केली, हा त्यांचा धंदा राहीलाय…

    - पाच राज्याच्या निवडणुकांवेळी भाव का वाढले नाहीत, राज्याला बदनाम करण्यापेक्षा भाजपने मोदींना बदनाम करावं…

    - मंत्री महोदय एसटीबद्दल काय सांगतात ते पाहावे लागेल…

    - कालच नीधी वाटपाबद्दल बैठक झाली सगळ्यांना समान निधी दिला जाईल यावर चर्चा झाली..

  • 22 Mar 2022 11:43 AM (IST)

    न्याय न मिळताच गुन्हे दाखल हे सरकार फसवं सरकार - श्वेता महाले

    - ऊसापेक्षाही वीजेचा संघर्ष जास्त… तालिबानी जाच सुरू आहे… वीजतोडणी सुरू आहे..

    - ऊर्जा मंत्री घोषणा करतात की तीन महिने वीजतोडणी करणार नाही, पण गावातून फोन येतायत की वीजतोडणी सुरूच आहे… मविआ दिलेला शब्द पाळत नाही

    - ऊर्जा मंत्र्यांनी पाहणी केली, ऊभं पिक जळालं, शेतकर्यांनी काळे झेंडे दाखवले , त्यांच्यावर आणि माझ्यावर गुन्हे दाखल झाले…

    - न्याय न मिळताच गुन्हे दाखल हे सरकार फसवं सरकार..

    - ऊद्धव ठाकरेंनी बांधावर दिलेला शब्द पाळला नाही ते विसरले…

    - वचननाम्यात सुरळित १२ तासांची वीज देण्याचं कबूल केलं, पण कोणतीच दयामाया नाही…

    - एसटी कर्मचार्यांबाबतही सरकारने बोळवण केली, त्यांच्या घरात खायला दाणा नाही… खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न होतोय…

    - जनतेत रोष आहे, मोर्चे बांधणी करा, पण विदर्भात काय दिलं हे संजय राऊतांनी सांगावं, वैधानिक विकास महामंडळ बंद केलं, ऊत्तर काय?

    - येत्या काळात वीजेसंदर्भात भाजप आक्रमक होणार, सरकारला स्वस्त बसू देणार नाही…

  • 22 Mar 2022 11:42 AM (IST)

    विदर्भ दौर्यावर संजय राऊत आले तर विदर्भाला फायदा होईल - चंद्रशेखर बावनकुळे

    संजय राऊत यांनी जनसंपर्क यात्रा करावी, नागपूरात फिरावं पण हे करत असताना विदर्भ वैधानिक मंडळ बर्खास्त केलं, धानाला बोनस नाही, पिक विमा योजना बंद, १३ हजार कोटी रुपये सरकारकडे आहेत, या सर्व विषयांना न्याय मिळायला हवा, संजय राऊत अडीच वर्षानंतर आलेयत…

    - विदर्भ दौर्यावर संजय राऊत आले तर विदर्भाला फायदा होईल…

    - ३० वर्षांचा माझा अनुभव, शिवसेनेनं संघटन वाढवावं पण विकास करा…

    - कालही वीज तोडणी झाली, सरकारचे आदेश झुगारून लावतात, अधिकारी सरकारचं ऐकत नाही… २० गावांची वीज कापली…

    - वीज खात्यावर प्रचंड नाराजी, मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही…

    - हा बजेट १०५ विधानसभेचा आहे, इतरांना काही मिळालं नाही… त्यामुळे नाराजी… काही आमदारांनी ४ हजार कोटी आपल्या मतदार संघात नेले त्यामुळे शिवसेना नाराज आहे…

  • 22 Mar 2022 11:17 AM (IST)

    शिवसेनेचे हिंदुत्व फिके पडलेय - रावसाहेब दानवे

    शिवसेनेचे हिंदुत्व फिके पडलेय

    बाळासाहेब असते तर एमआयएएम आणि काँग्रेस सोबत गेले नसते.

    आता उद्धव ठाकरेंमध्ये धमक राहिली नाही.

    जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांना पाठिंबा दिला जातोय.

    भाजप मुंबईत सुद्धा मुसंडी मारेल. .

    राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करावा

    मतासाठी दलित लागतात मात्र बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत

    आमचा एक नंबरचा शत्रू कॉंग्रेस दोन नंबरचा शत्रू एमआयएम आणि तीन नंबरचा शत्रू कम्युनिस्ट आहेत

    आता शिवसेनेचे हवा राहिलेली नाही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असं शिवसेना सांगते मात्र जनाधर सांभाळण्यासाठी त्यांना संवाद यात्रा करावे लागत आहे

    रावसाहेब दानवे यांची घणाघाती टीका

  • 22 Mar 2022 11:08 AM (IST)

    नांदेडमध्ये रंगपंचमीच्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चौघांना पाठलाग करून पोलिसांनी अटक केली

    नांदेडमध्ये रंगपंचमीच्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चौघांना पाठलाग करून पोलिसांनी अटक केलीय. अटक केलेले चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सगळे शहर रंगपंचमी साजरी करत असताना माळटेकडी उड्डाणपूलावर दीपक बिगाणिया या युवकांवर अज्ञात आरोपींनी गोळी झाडली होती, त्यात दिपक हा जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत चौघांना अटक केलीय.

  • 22 Mar 2022 11:05 AM (IST)

    आयकर विभागाची देशभर छापेमारी, हिरानंदानी ग्रुपवर छापे

    आयकर विभागाची देशभर छापेमारी

    मुंबई ठाण्यासह देशभरात छापे

    हिरानंदानी ग्रुपवर छापे टाकल्याची माहिती

  • 22 Mar 2022 10:49 AM (IST)

    नवाब मलिक यांच्याशी संबंधित प्रकरणी ईडीचे अधिकाऱ्यांकडून कुर्ला येथे चौकशी

    मुंबई आणि ठाण्यात ईडीची छापेमारी

    ईडीचे अधिकारी कुर्ला परिसरात पोहोचले आहेत

    नवाब मलिक यांच्याशी संबंधित प्रकरणी ईडीचे अधिकाऱ्यांकडून चौकशी

    गोवावाला कंम्पाऊंडमध्ये ईडीचे अधिकारी पोहोचले

    ईडी अधिकाऱ्यांसोबत वयस्कर व्यक्ती पोहोचले

    ईडीसोबत सीआरपीएफ जवानांचा ताफा गोवावाला कंम्पाऊंड

    ईडीचे अधिकारी नेमक्या कोणत्या कारणासाठी पोहोचले

  • 22 Mar 2022 10:45 AM (IST)

    महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पाठिंब्याने गोवा भाजपात धुसफूस वाढली

    महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पाठिंब्याने गोवा भाजपात धुसफूस वाढली

    भाजपचे 50 टक्के आमदार बंडाच्या पवित्र्यात

    भाजपने काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. यावेळी भाजपला 3 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र मगो चा हा पाठिंबा आता भाजपची डोकेदुखी ठरत आहे. मगो च्या पाठिंब्यावरून भाजपात दोन गट पडले असून अनेक आमदारांनी आपली नाराजी व्यक्त करून पक्षाविरोधातच बंड केले आहे.

  • 22 Mar 2022 10:07 AM (IST)

    गोव्याचा शपथविधी लांबणीवर

    गोव्याचा शपथविधी लांबणीवर

    उत्तर प्रदेश शपथविधीनंतर होणार गोव्याचा शपथविधी.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीला उपस्थित राहावे अशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि स्थानिक नेत्यांची आग्रहाची विनंती आहे.

    यापूर्वी 23 किंवा 24 मार्चला शपथविधी होईल अशी माहिती होती.

    पण, 23 तारखेला उत्तराखंध्ये शपथविधी आहे. 25 तारखेला उत्तरप्रदेशमध्ये शपथविधी आहे.

    त्यामुळे, गोव्याचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा शपथविधी उत्तरप्रदेश शपथविधींनंतर म्हणजेच 26 किंवा 27 मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे.

    ताळगाव येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये शपथविधीचा भव्य सोहळा होणार आहे.

    त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक मोठे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत.

  • 22 Mar 2022 09:56 AM (IST)

    विधानभवन परिसरात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचं आंदोलन

    विधानभवन परिसरात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचं आंदोलन

    हातात ऊस घेऊन आंदोलन

    एफआरपीच्या मुद्द्यावर सरकारवती जोरदार टीका

    विधानभवन परिसरात कार्यकर्त्यांच्यासोबत आंदोलन

    विधानभवन परिसरात भाजप कार्यकर्ते आक्रमक

    सरकार विरोधात घोषणा

    शेतकऱ्याला एक रकमी एफआरफी मिळाली पाहिजे.

  • 22 Mar 2022 08:30 AM (IST)

    मुंबईच्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येनं एसटी कर्मचारी दाखल, न्यायालयात संप प्रकरणाची सुनावणी होणार

    मुंबईच्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येनं एसटी कर्मचारी दाखल…

    - ऊन्हाचा ताप पाहता बांधण्यात आला मोठा पंडाल…

    - राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य असल्याचा अहवाल दिल्यानंतर सरकारने त्यानुसार भूमिका स्पष्ट केली,

    - मात्र आज न्यायालयात संपाप्रकरणी सुनावणी होणार असल्याने पुन्हा तारीख पडणार की, ठोस निर्णय होणार, या प्रश्नाच्या उत्तरासाठी एसटीतील संपकऱ्यांसह तमाम प्रवाशांच्या नजरा न्यायालयाकडे लागल्या आहेत…

    - विलीनीकरण होणार नाही तोपर्यथ आझाद मैदान सोडणार नाही असा पवित्रा या कर्मचार्यांनी घेतलाय…

  • 22 Mar 2022 08:28 AM (IST)

    भारताचा पहिला ई- पासपोर्ट लवकरच येणार

    नाशिक रोड नोट प्रेस मध्ये ई- पासपोर्ट छपाईचा मार्ग मोकळा

    मशीन खरेदी साठी जागतिक टेंडर साठी केंद्राची परवानगी

    व्यवसायिक तत्वावर ई- पासपोर्ट छपाई सुरू होणार

  • 22 Mar 2022 08:28 AM (IST)

    अकोल्यात एका 13 महीन्याच्या मुलीची हत्या करून आईचा ही आत्महतेचा प्रयत्न

    अकोल्यात एका 13 महीन्याच्या मुलीची हत्या करून आईचा ही आत्महतेचा प्रयत्न

    MIDC पोलीस स्टेशन च्या हद्दीतल्या बाभुळगाव येथील घटना....

    13 महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली... व त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून घेत आत्महतेचा प्रयन्त आईने केला आहे...

    आईचे नाव प्रियंका बोबडे असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरु आहे...

    पतीच्या कम्प्लेंट वरून पत्नीच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे....

    मुलीची हत्या करून स्वतःला संपविण्याचा प्रयन्त का केला केला याचा तपास MIDC पोलीस करत आहे....

  • 22 Mar 2022 08:27 AM (IST)

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क

    शहरात प्रवेशाच्या नऊ ठिकाणी नाका-बंदी

    सराईत गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवले

    संवेदनशील भागात राबवल जाणार कोम्बिंग ऑपरेशन

  • 22 Mar 2022 08:26 AM (IST)

    महापालिका तिजोरीत मालमत्ताकरातून 483 कोटी 50 लाखांचा महसूल

    -महापालिका तिजोरीत मालमत्ताकरातून 483 कोटी 50 लाखांचा महसूल; 106 मालमत्ता सील, तोडले नळ कनेक्शन

    -पिंपरी-चिंचवड महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांचे थकीत कर वसूलीची जोरदार कारवाई सुरये

    -आतापर्यंत एकूण 483.52 कोटी मालमत्ता कराची वसुली झाली आहे. 106 थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या तर 60 मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडलेत

    -अवैध बांधकाम शास्ती वगळून मुळ कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता थकीत मुळ कर भरून पाणीपुरवठा खंडीत होणे, मालमत्ता सील होणे, यासारखी कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन कर आकारणी व संकलन विभागाने केले आहे

  • 22 Mar 2022 08:25 AM (IST)

    पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू

    -मावळमधील कुसगाव धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालय

    -ते इतर सहा मित्रांसह कुसगाव धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते

    -अरिष गोगी आणि विनय कडू अशी दोघांची नाव आहेत

    -अरिष आणि विनय मित्रांसोबत पाण्यात उतरले, परंतु त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही अन ते बुडाले, त्यांना वाचवण्याचा मित्रांनी प्रयत्न केला.पण त्यांना यश आले नाही

  • 22 Mar 2022 08:25 AM (IST)

    चितळ शिकार प्रकरणातील फरारी गवसले अडीच वर्षानंतर बेड्या

    चितळ शिकार प्रकरणातील फरारी गवसले अडीच वर्षानंतर बेड्या

    विरुर (स्टे) राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत सिंधी गावात चितळाची शिकार करून फरार झालेल्या दोन आरोपींना राजुरा वनविभागाच्या कर्मचाऱ्याने  सिंधी गावात त्यांच्या राहत्या घरून अटक करण्यात आली.

    साईनाथ बापूजी कोडापे (३९), संजय मारोती कोडापे रा. सिंधी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

  • 22 Mar 2022 07:51 AM (IST)

    अकोला पेट्रोल दर

    अकोला पेट्रोल दर

    पेट्रोल 84 पैसे ने वाढ़ 110.58 पैसे

    डीझल 84 पैसे ने वाढ़ 93.39 पैसे

    सहा महिन्या नंतरची ही पहिली वाढ़

  • 22 Mar 2022 07:17 AM (IST)

    गुरूवारी 24 तारखेला शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

    गुरूवारी 24 तारखेला शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

    पर्वती जलकेंद्र पंपींग, एस.एन.डी.टी, वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे निम्म्या शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

    शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल असे पाणी पुरवठा विभागाची माहिती

  • 22 Mar 2022 07:12 AM (IST)

    पोलिसांवर गोळीबार करणारे दोघेही मालेगाव पोलिसांना शरण

    सराईत गुन्हेगार - जमाल बिल्डर व सलमान

    शहरात लूम कारखानदाराचे अपहरण करुन त्याला २८ हजारांना लुटल्याप्रकरणी पोलीस शोध घेत असलेल्या दोन संशयित सराईत गुन्हेगारांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवरच गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला होता. सुदैवाने या हल्ल्यात दोन पोलीस बचावले होते. पोलीस या दोघा सराईत गुन्हेगारांच्या शोधात असतांना सोमवारी दुपारी दोन ही सराईत गुन्हेगार मालेगाव पोलिसांना शरण आले.

  • 22 Mar 2022 07:10 AM (IST)

    बुलडाण्यात कोरोना काळात दीड हजार प्रसूती मोफत,

    कोरोना काळात दीड हजार प्रसूती मोफत,

    महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा रुग्णांना आधार,

    कोरोना काळात सर्वच शस्त्रक्रिया बंद होत्या,

    त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णलाय शिवाय पर्याय नव्हता,

    मात्र कोरोना काळापूरतेच गरिबांना आधार देण्यासाठी प्रसूती चा या योजनेत समावेश होता

  • 22 Mar 2022 06:55 AM (IST)

    पुणे महापालिकेतील सदस्यांची मुदत संपल्यानंतर महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आलेत

    महापालिकेतील सदस्यांची मुदत संपल्यानंतर महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आलेत

    आयुक्त विक्रम कुमार महापालिकेचे प्रशासक म्हणून पहिलीच बैठक आज घेतायत

    जून्या प्रकल्पांना प्राधान्य असल्याचं त्यांनी म्हटलंय

    मुंबईच्या धर्तीवरचं पुण्यातही कामकाज चालणार आहे..

    आजच्या बैठकीत विकासकामांबाबत काय निर्णय घेतले जातात हे पाहावं लागेल ...

  • 22 Mar 2022 06:54 AM (IST)

    काल राज्यभरात झालेल्या दहावीच्या हिंदी पेपरमध्ये कॉपी करताना विद्यार्थ्यांवर कारवाई

    पुणे

    काल राज्यभरात झालेल्या दहावीच्या हिंदी पेपरमध्ये कॉपी करताना विद्यार्थ्यांवर कारवाई

    राज्यभरात एकुण 15 विद्यार्थ्यावर ही कारवाई करण्यात आलीये

    यामध्ये सर्वाधिक पुणे विभागात 13 विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे

    तर मुंबई विभागात दोघांवर ही कारवाई करण्यात आलीये

    कॉपीसारखे प्रकार टाळा असं आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं केलंय...

  • 22 Mar 2022 06:12 AM (IST)

    अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे शिवजयंती जल्लोषात साजरी

    अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे शिवजयंती जल्लोषात साजरी

    जाणता राजाच्या १०० कलाकारांनी सादर केला शिवजन्म

    ढोल-ताशांच्या गजरात रंगला शिवजन्माचा सोहळा

  • 22 Mar 2022 06:11 AM (IST)

    मुंबई महानगरपालिकेची भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नंतर मुंबई महानगरपालिकेनी आता भाजप नेते मोहित कँबोज यांना नोटीस पाठवली आहे..

    मोहित कँबोज यांच्या खुशी पैराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आली आहे असा पालिकेला शंका आहे.

  • 22 Mar 2022 06:09 AM (IST)

    पुण्यात पेट्रोलचा उच्चांकी दर

    पुण्यात पेट्रोलचा उच्चांकी दर

    पेट्रोलचा दर पोहोचला 110 रुपये 35 पैशांवर

    तर डीझेल 93 रुपये 14 पैशांवर

    वाढत्या पेट्रोलच्या किमतीनं पुणेकर हैराण !

Published On - Mar 22,2022 6:00 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.