Eknath Khadse ED inquiry : “ईडी बोलावेल तेवढ्या वेळा हजर राहू”, अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांचं आश्वासन?

ईडी चौकशीनंतर अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांनी हवं तेव्हा हजर राहण्याचं आश्वासन दिलंय का? असा प्रश्न उपस्थित केलाय.

Eknath Khadse ED inquiry : ईडी बोलावेल तेवढ्या वेळा हजर राहू, अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांचं आश्वासन?
एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 9:33 PM

मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांची तब्बल 9 ईडी चौकशी झाली. भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहारप्रकरणी ही चौकशी झाली. त्यानंतर खडसेंनी स्वतः माध्यमांशी बोलणं टाळलं. ते चौकशी झाल्यावर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले. त्यांच्या वकिलांनी माध्यमांना या चौकशीची माहिती दिली. यावेळी वकिलांनी ईडी चौकशीसाठी जितक्या वेळा बोलावेल तितक्या वेळा आम्ही हजर राहू असं सांगितलंय. त्यामुळे ईडीकडून अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांनी हवं तेव्हा हजर राहण्याचं आश्वासन दिलंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय (Eknath Khadse assure ED to present whenever needed advocate inform media).

एकनाथ खडसे यांचे वकिल म्हणाले, “ईडीच्या कार्यालयात एकनाथ खडसे यांची चौकशी झालीय. चौकशीच आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलंय. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आलीय. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासलीय. याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिलीत. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असं ईडीला सांगितलंय. ईडीने पैशांच्या व्यवहाराबाबत, तसंच भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी केली. खडसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.”

चौकशीला जाण्यापूर्वी भाजपवर हल्लाबोल

ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर आज सकाळी 11 च्या सुमारास एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर झाले. त्यावेळी या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले होते.

अजून किती चौकशा करणार?

“ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?” असा सवाल त्यांनी केला.

“चौकशीत सहकार्य केलं. अनेक स्टेटमेंट व्हेरीफाय केले. ईडीला हवे असलेले कागदपत्र दिले आहेत. अजून काही लागणारी कागदपत्रे 10 दिवसात देणार आहोत. तसंच गरज भासेल तेव्हा उपस्थित राहणार असं खडसेंनी सांगितलं. पैशांच्या व्यवहाराबाबत चौकशी केली. भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी झाली, अशी माहितीही देण्यात आली.

हेही वाचा :

Eknath Khadse ED Inquiry : एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी, सहकार्य करण्याचं खडसेंचं आश्वासन

ईडीच्या चौकशीचा राजकारणाशी संबंध लावणे चुकीचे, खसडेंनी चौकशीला सामोरे जावे: प्रवीण दरेकर

VIDEO: खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात, फडणवीस त्यावर नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ पाहा :

Eknath Khadse assure ED to present whenever needed advocate inform media

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.