Eknath Shinde : बडवे, वर्षाची दारं, काँग्रेस-राष्ट्रवादी, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, एकनाथ शिंदेचा आधार, संजय शिरसाट यांच्या पत्रातले 5 मुद्दे चर्चेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेना आमदारांची होणारी अडचणही सांगितली आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात वर्षाची दारं ही आमच्यासाठी बंद होती म्हणत गंभीर आरोपही केले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रालयातील अनुपस्थितीवरही भाष्य केलं आहे.  

Eknath Shinde : बडवे, वर्षाची दारं, काँग्रेस-राष्ट्रवादी, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, एकनाथ शिंदेचा आधार, संजय शिरसाट यांच्या पत्रातले 5 मुद्दे चर्चेत
बडवे, वर्षाची दारं, काँग्रेस-राष्ट्रवादी, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, एकनाथ शिंदेचा आधार, संजय शिरसाट यांच्या पत्रातले 5 मुद्दे चर्चेतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 2:03 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात आजपर्यंत अनेक लेटरबॉम्ब पडले आहेत. मात्र आज जो एका  शिवसेनेच्या बंडखोर आमदाराने लेटरबॉम्ब टाकलाय. त्या लेटर बॉम्बची सध्या चांगलीच चर्चा आहे. शिवसेनेचे गुवाहाटातील असणारे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat Latter) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना एक भावनिक पत्र लिहीत सध्याची राजकीय परिस्थिती का उद्भवली आणि आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत का आलो? याची थेट कारणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे. या पत्रातले पाच मुद्दे सध्या जास्त चर्चेत आहेत. त्यांनी बडवे असा स्पष्ट उल्लेख कर मुख्यमंत्र्यांच्या आजुबाजुच्या लोकांवर टीका केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेना आमदारांची होणारी अडचणही सांगितली आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात वर्षाची दारं ही आमच्यासाठी बंद होती म्हणत गंभीर आरोपही केले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रालयातील अनुपस्थितीवरही भाष्य केलं आहे.

  1. काल दारं खऱ्या अर्थानं खुली– आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय, पत्रास कारण की…अशी भावनिक सुरूवात त्यांनी त्यांच्या पत्राची केली आहे. तर ते पुढे म्हणतात, काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) वडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश | मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही..अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.
  2. अपमानास्पद वागणूक दिली– या पत्रात ते असेही म्हणतात,  मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप वडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे.
  3. बडव्यांनी कधी व्यथा ऐकली नाही– हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या | आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्या ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना. आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.
  4. आमच्यावर अविश्वास दाखवला– हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे | अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
  5. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे अडचण– साहेब, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली काम करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा. या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं माननीय बाळासाहेबांचं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाच्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. काल तुम्ही जे काही बोललात. जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं, असा शेवट त्यांनी त्यांच्या पत्राचा केला आहे.
Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.