लोकांना मदत करताना कोरोना, पीपीई किट घालून एकनाथ शिंदे फ्रंटलाईन शिवसैनिकांच्या भेटीला

पालकमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना धीर देण्यासाठी थेट पीपीई किट घालून भेटी घेत आहेत (Eknath Shinde meet corona infected Shivsena activist).

लोकांना मदत करताना कोरोना, पीपीई किट घालून एकनाथ शिंदे फ्रंटलाईन शिवसैनिकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Aug 21, 2020 | 9:12 PM

ठाणे : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था संघटना मदतीसाठी पुढे आल्या. त्यात शिवसेनेचाही समावेश आहे. अनेक शिवसैनिक फ्रंटलाईनवर उभे राहून गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यात त्यांना कोरोना संसर्ग होत असल्याच्याही घटना घडत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये अशाच घटना समोर येत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांना धीर देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे थेट पीपीई किट घालून भेटी घेत आहेत (Eknath Shinde meet corona infected Shivsena activist).

सध्या केडीएमसीचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर आणि महानगर प्रमुख विजय साळवी यांना अशाच प्रकारे कोरोनाची लागण झाली आहे. विजय साळवी यांच्यावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय साळवी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना मिळणाऱ्या उपचाराची डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच साळवी यांना तुम्ही लवकर बरे होणार आहात, काळजी करु नका असं म्हणत धीर दिला. तुम्ही आराम करा, दुसऱ्या रुग्णालयात शिफ्त व्हायचं का? असंही विचारलं.

साळवी यांनी आपल्या कुटुंबाविषयी काळजी व्यक्त केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मी स्वतः त्यांची भेट घेतो, असं आश्वासन दिलं. त्यांनी आपण लवकरच फोन करु आणि तु बरा झाला का अशी विचारणा करु असंही म्हटलं. स्वतः एकनाथ शिंदे चौकशीला आल्याने आणि औषधोपचाराची व्यवस्था केल्याने शिवसैनिकांनाही भरुन आलं. “साहेब तुम्ही सर्व सामान्य शिवसैनिकासाठी इथपर्यंत आलात, लाखोंची औषधं दिली. खूप बरं वाटलं,” अशी भावना विजय साळवी यांनी व्यक्त केली.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत कोरोनाने थैमान घातले आहेत. असं असलं तरी कल्याण डोंबिवलीत बरे होणाऱ्यांचं प्रमाण (रिकव्हरी रेट) 85 टक्के आहे. मात्र, यात आतापर्यंत 538 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये अनेक शिवसैनिक आहेत. त्यांनी कोरोना काळात फ्रंटलाईनला येऊन काम केले. यामध्ये शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर, परिवहन सदस्य नाना यशवंतराव, ज्येष्ठ शिवसैनिक दीपक सोनाळकर, पदाधिकरी सतीश पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

Ganeshotsav 2020 | गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना टोलमाफी, सरकारचा चाकरमान्यांना दिलासा

Maratha Reservation | ‘त्या’ पदावरुन अशोक चव्हाणांना हटवा, एकनाथ शिंदेंची नियुक्ती करा, विनायक मेटेंची मागणी

Eknath Shinde meet corona infected shivsena activist

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.