Eknath Shinde Mla List : एकनाथ शिंदेंसोबतचा आमदारांचा सध्याचा आकडा किती? एका ना एका नावासहीत वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

शिंदे गटाने जास्त आमदारांचा आकडा आमच्याकडे म्हणत आपल्या गटाला नवं शिवसेना बाळासाहेब असं नावंही देऊन टाकलंय. मग शिंदेसोबत एकूण आमदार किती? असाही सवाल विचारला जात आहे. त्याचे उत्तर आम्ही शोधलंय.

Eknath Shinde Mla List : एकनाथ शिंदेंसोबतचा आमदारांचा सध्याचा आकडा किती? एका ना एका नावासहीत वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
Image Credit source: TV9 Marathi
दादासाहेब कारंडे

|

Jun 25, 2022 | 3:37 PM

गुवाहाटी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज पाच दिवस झाले आहेत. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार दोन हजार किलोमीटर दूर गावाहाटीत आहे. मात्र या बंडामुळे महाराष्ट्रात शिवसैनिकांनी (Shivsena) रान पेटवलं आहे. शिवसैनिकांनी कुणाचं ऑफीस फोडलं. तर कुणाच्या पुतळ्यांची जाळपोळ केलीय. तर कुणाच्या पोस्टरला काळं फासलं आहे. सध्या ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी महाराष्ट्रात धुरळा उडवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनीही आक्रमक मोडवर येत बैठकांचा सपाटा लावला आहे. या आजच्या बैठकीत तर त्यांनी शिंदे गंटाविरोधात पाच ठारव पास करत शिंदे गटाला जोरदार पंच मारला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ऐन पावसाळ्यातही जळत्या वणव्यासारखं पाहायला मिळतंय. तर तिकडे शिंदे गटाने जास्त आमदारांचा आकडा आमच्याकडे म्हणत आपल्या गटाला नवं शिवसेना बाळासाहेब असं नावंही देऊन टाकलंय. मग शिंदेसोबत एकूण आमदार किती? असाही सवाल विचारला जात आहे. त्याचे उत्तर आम्ही शोधलंय. शिंदे गटात आता शिवसेनेचे 38 बंडखोर आमदार आहेत. तर 9 अपक्ष आमदारही आहेत. हा टोटल आकडा आता 47 वर गेलाय.

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे 38 बंडखोर आमदार

 1. एकनाथ शिंदे
 2. शहाजी पाटील
 3. अब्दुल सत्तार
 4. शंभुराज देसाई
 5. अनिल बाबर
 6. तानाजी सावंत
 7. संदीपान भुमरे
 8. चिमणराव पाटील
 9. प्रकाश सुर्वे
 10. भरत गोगावले
 11. विश्वनाथ भोईर
 12. संजय गायकवाड
 13. प्रताप सरनाईक
 14. राजेंद्र पाटील
 15. महेंद्र दळवी
 16. महेंद्र थोरवे
 17. प्रदीप जयस्वाल
 18. ज्ञानराज चौगुले
 19. श्रीनिवास वनगा
 20. महेश शिंदे
 21. संजय रायमूलकर
 22. बालाजी कल्याणकर
 23. शांताराम मोरे
 24. संजय शिरसाट
 25. गुलाबराव पाटील
 26. प्रकाश आबिटकर
 27. योगेश कदम
 28. आशिष जयस्वाल
 29. सदा सरवणकर
 30. मंगेश कुडाळकर
 31. दीपक केसरकर
 32. यामिनि जाधव
 33. लता सोनावणे
 34. किशोरी पाटील
 35. रमेश बोरणारे
 36. सुहासे कांदे
 37. बालाजी किणीकर
 38. दिलीप मामा लांडे

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे अपक्ष आमदार

 1. बच्चू कडू
 2. राजकुमार पटेल
 3. चंद्रकांत पाटील
 4. नरेंद्र भोंडेकर
 5. राजेंद्र येड्रावरकर
 6. किशोर जोरगेवार
 7. मंजुळा गावित
 8. विनोद आग्रवाल
 9. गीता जैन

शिंदे गटाचं पुढचं पाऊल काय?

सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र पाहिल्यास सर्वसामान्य शिवसैनिकांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांना वाढत चालला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा कादेशीर पेचही वाढत चालला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर विलीकरणचाच पर्याय असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे आमदारांच्या निलंबनासाठी ठाकरे समर्थ शिवसेना नेते हे विधानसभा उपाध्यक्षांच्या गाठीभेटी घेत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचं पुढचं पाऊल काय असणार? याकडेही सध्या संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें