ठाण्यातील आपत्कालीन कक्षातील वायरलेस, दूरध्वनी सेवा सुरू आहे का?; एकनाथ शिंदेंनी केली खातरजमा

मुंबईपाठोपाठ ठाण्यालाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आजपासून पुढचे पाच दिवस ठाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठाण्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवू नये म्हणून ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या आपत्कालीन कक्षाला आज भेट दिली.

ठाण्यातील आपत्कालीन कक्षातील वायरलेस, दूरध्वनी सेवा सुरू आहे का?; एकनाथ शिंदेंनी केली खातरजमा
eknath shinde
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 8:06 PM

ठाणे: मुंबईपाठोपाठ ठाण्यालाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आजपासून पुढचे पाच दिवस ठाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठाण्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवू नये म्हणून ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या आपत्कालीन कक्षाला आज भेट दिली. यावेळी आपत्कालीन कक्षातील वायरलेस सेवा आणि दूरध्वनी सेवा सुरू आहे का? याची एकनाथ शिंदे यांनी स्वत: खातरजमा करून घेतली. (Eknath Shinde takes stock as heavy rain inundates parts of Thane)

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्कालीन कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच महापालिकेने आपत्कालीन काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या समवेत महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी आवश्यक दूरध्वनी तसेच वायरलेस सेवा सुरळीपणे चालू आहे का? याची शिंदे यांनी स्वतः खातरजमा करून घेतली. तसेच कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत की नाही याची खातरजमाही केली. पावसाळ्यात आपत्ती उद्भवल्यास त्या आपत्तीस तोंड देण्यासाठी महापालिका सक्षम असल्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.

कोणतीही दुर्घटना नाही

महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सातत्याने नालेसफाई तसेच पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी केली आहे. शहरात नाल्याची साफसफाई पूर्णतः झाल्याने पाणी साचून कोणत्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला नाही. झाडे उन्मळून पडणे, भुस्खलन अशा कोणत्याही प्रकारची घटना घडून जीवित तसेच वित्तहानी झालेली नाही, असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालिका सज्ज

पाणी साठलेल्या ठिकाणी सबमर्सिबल पंप लावून तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना महापालिकेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सबमर्सिबल पंप बसविणे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे बोटींची व्यवस्था करणे, तसेच मदतीसाठी टीडीआरएफच्या तसेच एनडीआरएफ टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत. पावसाळ्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

यावेळी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आपत्कालीन कक्षाद्वारे करण्यात येणाऱ्या विविध कार्यवाहींची सविस्तर माहिती दिली. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष सुयोग्यप्रकारे पावसाळा हाताळेल, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री – 1800 222 108 व हेल्पलाईन – 022 25371010 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले. (Eknath Shinde takes stock as heavy rain inundates parts of Thane)

संबंधित बातम्या:

पहिल्याच पावसाने मुंबई पाठोपाठ ठाण्यालाही छळलं, लोकल सेवा ठप्प, इमारतीच्या संरक्षण भिंत कोसळल्या, जनजीवन विस्कळीत

Mumbai Rains Live: पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

लोकल ठप्प, बसेस नाहीत, वाहतुकीची कोंडी अन् पावसाची रिपरिप; चाकरमानी म्हणतात, जाये तो जाये कहाँ!

(Eknath Shinde takes stock as heavy rain inundates parts of Thane)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.