EPFO ची आकडेवारी, मार्चमध्ये तब्बल 8 लाख नोकऱ्या मिळाल्या!

  • Publish Date - 9:49 am, Wed, 22 May 19
EPFO ची आकडेवारी, मार्चमध्ये तब्बल 8 लाख नोकऱ्या मिळाल्या!
खाजगी नोकरी करणार्‍या कर्मचार्‍यांना विशेष संधी

मुंबई :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओने रोजगाराबाबत नवी आकडेवारी जाहीर केली आहे. ईपीएफओच्या मते, मार्च महिन्यात तब्बल 8 लाख 14 हजार नव्या नोकऱ्या मिळाल्या. हा आकडा फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत वाढला आहे. फेब्रुवारीत 7 लाख 88 हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला, असं ईपीएफओने म्हटलं आहे. एकंदरीत 2018-19 मध्ये तब्बल 67 लाख 59 हजार रोजगार दिल्याची आकडेवारी ईपीएफओने जारी केली आहे.

22 ते 25 वर्षीय तरुणांना नोकरी

ईपीएफओच्या मते, मार्च 2019 मध्ये सर्वाधिक नोकऱ्या 22 ते 25 वर्षीय तरुणांना मिळाल्या. या वयोगटातील सव्वा दोन लाख तरुणांना मार्च महिन्यात नोकरी मिळाली. त्यानंतर 18 ते 21 वर्ष या वयोगटातील तरुणांना नोकऱ्या मिळाल्या.  आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये जानेवारी 2019 मध्ये सर्वाधिक 8.31 लाख नोकऱ्यां मिळाल्या.

नोकरीच्या संधी घटल्या

एप्रिल 2019 मध्ये जारी केलेल्या रोजगाराचे आकडे हे मार्च 2018 च्या तुलनेत घटल्याचे दिसते. ईपीएफओ ही संघटना कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा ताळेबंद ठेवते. जवळपास 6 कोटी कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. एप्रिल 2018 पासून ईपीएफओ नोकऱ्यांबाबतचे आकडे जारी करत आहे.

संबंधित बातम्या  

आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही   

1 एप्रिलपासून नवीन नियम लागू, घर खरेदी स्वस्त  

‘आधार’वरुन अवघ्या तीन दिवसात पीएफ काढणं शक्य! 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI