भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. (facebook users asked sanjay rathod about pooja chavan suicide case)

भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल
pooja chavan

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्यामुळे बंजारा समाजातील अनेक तरुणांना धक्का बसला आहे. काही नेटकऱ्यांनी तर थेट राठोड यांच्या फेसबुकवर येऊन त्यांनाच प्रश्न विचारले आहेत. पूजाने आत्महत्या केली की हा घातपात आहे, अशी विचारणा नेटकऱ्यांकडून केली जात आहे. (facebook users asked sanjay rathod about pooja chavan suicide case)

पूजा चव्हाणने रविवार 7 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. तोपर्यंत वन मंत्री संजय राठोड हे त्यांच्या फेसबूकवर सक्रिय होते. 9 फेब्रुवारी रोजी त्यांनी चेंबूरच्या छेडानगर परिसरातील कांदळवनाच्या जागेवरील अनधिकृत झोपड्या हटवल्याची माहिती फेसबूकवर टाकली होती. मात्र, त्यानंतर राठोड यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यानंतर विरोधकांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उचलून धरलं आणि दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट राठोड यांचं या प्रकरणात नाव घेतलं. तेव्हापासून राठोड हे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर एकही पोस्ट केलेली नाही.

तुम्ही समाजाचे मोठे नेते

राठोड फेसबूकवर सक्रिय नसले तरी त्यांच्या चेंबूरमधील झोपड्या हटवल्याच्या शेवटच्या पोस्टवरच काही नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनिल राठोड नावाच्या एका नेटकऱ्याने तर, भाऊ पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई प्रश्न तम वटान पकडो तम गोरमाटी समाजेर मोठे नेता छो असं विचारलं आहे. याचा अर्थ भाऊ पूजाताईने आत्महत्या केली की घातपात झाला? हा प्रश्न तुम्ही उचलून धरा
तुम्ही गोरमाटी( बंजारा) समाजाचे मोठे नेते आहात, असं या नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

शिव्या आणि समर्थन

या पोस्टमध्ये काही नेटकऱ्यांनी राठोड यांचं समर्थन केलं आहे. तर काहींनी शिव्या घातल्या आहेत. काही जण राठोड यांना तुम्ही कुठे लपून बसले आहात? असा सवाल केला आहे. काहींनी राठोड यांचा निषेध नोंदवला आहे. तर काहींनी बंजारा समाजेरो हिरो, बंजारा समाजाचे हिरो, माझे आदर्श असं म्हणून राठोड यांचं कौतुक केलं आहे.

 

काय घडलं त्या रात्री?

पूजा चव्हाणचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. मात्र 7 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता तिनं इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. (facebook users asked sanjay rathod about pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

Pooja Chavan Suicide Case Live Updates : संजय राठोड प्रकरणावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर?; मुख्यमंत्र्यांना दिला पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा रिपोर्ट!

Published On - 6:26 pm, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI