AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजाचं खरं नाव काय? लग्न पत्रिकेवर छापलेले नाव वाचलं का?

Indurikar Maharaj Real Name: हरी भक्त पारायण इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा लग्नसोहळा आहे. महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पण इंदुरीकर महाराज यांचे खरं नाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? लग्न पत्रिकेवर त्यांचे नाव काय आहे?

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजाचं खरं नाव काय? लग्न पत्रिकेवर छापलेले नाव वाचलं का?
इंदुरीकर महाराजImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 03, 2026 | 1:58 PM
Share

Indurikar Maharaj Real Name: इंदुरीकर महाराज हे अबालवृद्धात अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे किर्तन आणि प्रबोधन हे अनेकांचं जीवन बदलणारं ठरलेलं आहे. खळखळून हसवणारं त्यांचं किर्तन एक मोठा संदेश देऊन जाते. इंदुरीकर महाराजांचे व्हिडिओ, त्यांचे वक्तव्य, त्यांचे मीम्स सर्वच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. पण बोले तैसा चाले, त्याची… यावरून महाराज सध्या ट्रोल होत आहे. लोकांना साधेपणाचा संदेश ते किर्तनातून देतात. पण मुलीचा अत्यंत शाही पद्धतीने लग्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज ट्रोल होत आहेत. पण इंदुरीकर महाराजांचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का? लग्न पत्रिकेवर त्यांचं काय नाव आहे?

सामाजिक प्रश्नावर अचूक टीका

इंदुरीकर महाराजाचं सामाजिक निरीक्षण अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. सध्या समाजापुढं सुरू असलेल्या विविध प्रश्नांवर ते त्यांच्या किर्तनात आसूड ओढतात. त्यांच्या खास बोली आणि देही शैलीमुळे, हावभावामुळे किर्तनाकडे तरुणही वळले आहेत. अबालवृद्धांमध्ये ते प्रसिद्ध झाले आहेत. ते सामाजिक प्रश्नांवर समाजेच कान ओढायला कमी करत नाहीत. पण आता कृतीत आणि उक्तीत फरक जाणवत असल्याचा आरोप टीकाकार त्यांच्यावर करत आहेत. सर्वसामान्यांना साधेपणानं विवाह सोहळे करण्याचा सल्ला ते देतात. पण स्वतःच्या मुलीचा विवाहासाठी त्यांनी 100 एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. लाखो लोकांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे. त्यांची मुलगी ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्यावेळी सुद्धा असाच वाद उद्भवला. तेव्हा महाराजांनी टीकाकारांवर टीका केली.

इंदुरीकर महाराजाचं खरं नाव काय?

इंदुरीकर महाराजांचं खरं नाव लग्नपत्रिकेवर वधुपिता म्हणून आहे. त्यांचं पूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील इंदोरी हे त्यांचं मुळ गाव आहे. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1972 रोजी झाला. त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. पण लहानपणापासून अध्यात्माची आवड असल्याने पुढे त्यांनी समाज प्रबोधनासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या पत्नी शालिनी देशमुख या सुद्धा कीर्तनकार आहेत. एका दिवशी ते तीन किर्तन करत असल्याचे सांगितले जाते. आता ते एका किर्तनासाठी किती मानधन घेतात आणि त्यांची एकूण संपती किती यावरूनही सोशल मीडियावर मोठे अंदाज वर्तवले जात आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं