शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत जवळपास 6.3 लाख शेतकऱ्यांना 5,080 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. तांत्रिक अडचणी आणि केवायसीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही यावेळी दिलासा मिळणार आहे.

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्याच जाहीर होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवरचा मोठा भार कमी होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना ही यादी आल्यानंतर पुढच्या कामालाही लागता येणार आहे. त्यामुळे आज किंवा उद्या ही यादी जाहीर झाल्यावर बळीराजाला आपलं नाव चेक करता येणार आहे.
कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तिसऱ्या यादीत तब्बल 6 लाख 30 हजारांच्या आसपास लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांसाठी एकूण 5 हजार 80 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील दोन याद्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. केवायसीमुळे कर्जमाफीचा लाभ न मिळू शकलेल्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
हिंगोलीत किती पात्र?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 525 शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांपैकी 33 हजार 926 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत.
वचन पूर्ण केलं
दरम्यान, गेल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीबद्दलची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली होती. यावर्षी राज्यातील 53 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं वचन दिलं होतं. 36 हजार कोटी रुपयाचा कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलास देण्याचा काम सरकारने केलं आहे. निवडून आल्यावर वचन दिला होतं. 45 हजार शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा वीज माफ केली. आणि पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही असं काम सरकारने केलंय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात वीज आणि पाणी नसेल तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होऊ शकत नाही. हे मी मानणारा आहे. या गोष्टी शेतकऱ्यांना मिळाल्या तर शेतकऱ्यांचा मुलगा चपऱ्याश्याची नोकरी मागण्यासाठी जाणार नाही. शेतात काम करणाऱ्या मजूर बहिणीला मजबूत करायचं आहे. महाराष्ट्र सरकारमधून त्यांना जमीन देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.