कुर्ला स्थानकात उभ्या असलेल्या लोकलला आग, धुराचे लोळ उठल्याने घबराट
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात उभ्या असलेल्या लोकलला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. प्राथमिक माहितीनुसार या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. आगीने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

मध्य रेल्वेच्या अत्यंत गर्दीचे स्थानक असलेल्या कुर्ला स्थानकात यार्डात उभ्या असलेल्या रिकाम्या लोकलला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या साडे आठच्या सुमारास घडली. या आगीचा धुर मोठा पसरल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. या आगीने लोकल सेवेलाही फटका बसला. या आगीमध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे म्हटले जात आहे.
गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकातील यार्डात कचरा उचलणाऱ्या एका लोकलला आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे स्थानकात एकच घबराट पसरुन मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. कचरा वाहून नेणारी ही विशेष लोकल साइडिंग लाईनमध्ये उभी होती. तिच्यातील कचऱ्याला ही आग लागल्याने धुराचे लोळ आकाशात गेले. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली. या प्रकरणात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
रेल्वे ट्रॅकच्या मधील कचरा वाहून नेणारी विशेष लोकल कुर्ला स्थानकातील साईडिंगवर उभी होती. त्यास अचानक रात्री सव्वा आठच्या सुमारास आग लागली, आगीच्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाची धावाधाव झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन उपकरणाचा वापर करण्यात आला. ओव्हरहेड वायरला आगीचा स्पर्श होऊन कोणतीही हानी होऊ नये म्हणून विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.
विद्युतप्रवाह बंद करावा लागला, लोकल खोळंबल्या
परंतु यासाठी त्यांना गाड्यांना २५,००० व्होल्ट वीज पुरवणारी ओव्हरहेड केबल (ओएचई) बंद करावी लागली. मध्य रेल्वेच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, आग विझवण्यासाठी विद्याविहार आणि सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रात्री २०.३८ ते २०.५५ या वेळेत ओएचई बंद करण्यात आली होती.रात्री ८.५५ वाजता आग विझवण्यात यश आले आणि त्यानंतर लगेचच रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ओएचई पूर्ववत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
