AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पहिली दुर्घटना, मालाडमध्ये दहीहंडी फोडताना मुलाचा मृत्यू

दहिहंडी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र या सणावर यंदाही विरजन पडलं आहे. कारण दहीहंडी फोडताना 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत पहिली दुर्घटना, मालाडमध्ये दहीहंडी फोडताना मुलाचा मृत्यू
| Updated on: Sep 05, 2026 | 5:15 PM
Share

गोपाळकाला निमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांमध्ये दहिहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असं असताना मुंबईत एक दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईच्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सर्वत्र जल्लोष सुरू असताना मुंबईत मात्र या सणाला गालबोट लागलं आहे. 5 सप्टेंबर 2026  रोजी दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम पडून 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी असं सजग नागरिक सांगत आहेत. आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 32 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे.

32 जखमी गोविंदाचं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सीटी रुग्णालयात 29 जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 25 जणांवर उपचार करून सोडलं. अजूनही चार गोविंदावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. ईएस रुग्णालयात 2 गोविंदा जखमी आहेत. डब्ल्यूएस रुग्णालयात आणखी एक गोविंदा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आलं आहे. हा आकडा 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतचा आहे. जखमींचा आकडा रात्रीपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोविंदांनी उत्साहाच्या भरात कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी काळजी घ्यावी.

पुण्यातही एका महिलेचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. लोखंडी कमान कोसळल्याने 45 वर्षीय सलमा पठाण यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, रात्री दहीहंडीची सजावट काढण्याचं काम सुरू असताना लोखंडाचा तुकडा त्यांच्या डोक्यावर पडला. त्यानंतर गंभीर अवस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सलमा पठाण यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'