Nitin Raut: आताच वीज बिल का वाढलं हा महत्वाचा प्रश्न; नितीन राऊत म्हणाले विजेबाबत आम्हीच योग्य धोरण राबवले…

कोरोना काळात कोळशाचं संकट राज्यावर आले असताना आणि कोळसा आयात करावा लागूनही त्यावेळी वीज कंपन्या योग्य पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला गेला. केंद्राने जीएसटीचा पैसा दिला नाही त्यामुळे अनेक काम थांबली पण काम झाली नाही असं म्हणता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

Nitin Raut: आताच वीज बिल का वाढलं हा महत्वाचा प्रश्न; नितीन राऊत म्हणाले विजेबाबत आम्हीच योग्य धोरण राबवले...
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 9:05 PM

नागपूरः कोरोना काळात मी ऊर्जा मंत्री म्हणून माझी जिम्मेदारी निभावली आहे, त्याकाळात काही प्लांट बंद पडण्याच्या मार्गावर होते, मात्र सुरू करून वीज निर्मिती वाढवण्याचा प्रयत्न केला असल्याचे काँग्रेसचे आमदार नितीन राऊत (Former Energy Minister Nitin Raut) यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की वीज निर्मिती वाढविण्याचाही प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना त्यांनी वीज दराबाबत सवाल उपस्थित करून सांगितले की, वीज दर ऊर्जा खाते ठरवत मात्र वीज वापरली गेली तर त्याचे बिल हे भरावेच लागते. हे सांगत असतानाच त्यांनी आताच वीज बिल (Electricity bill) का वाढलं हा महत्वाचा प्रश्न असल्याचे सांगितले. आपण ऊर्जा मंत्री असताना कोरोनाच्या काळात कोळसा संकट आलेलं असतानाही वीज बिल वाढलं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोळाशाच्या संकटावर तोडगा

जागतिक पातळीवर कोळशाचं संकट आले होते, मात्र त्यावरही आम्ही तोडगा काढला आणि नागरिकांना 24 तास वीज देण्याचा आम्ही प्रयत्न केला. इतर राज्यातून वीज कपातीचे धोरण अवलंबिले असतानाही इतर राज्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रात होऊ दिले नाही असंही त्यांनी सांगितले. योग्य धोरण राबवल्यामुळेच माझ्या काळात पस्तीशे कोटीची बचत केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुड गव्हर्नन्स म्हणून पाहिलं स्थान

माझ्या कार्यकाळात वीजेबाबत राज्यात योग्य धोरम राबवत वीज कंपनीना गुड गव्हर्नन्स म्हणून पाहिलं स्थान काही दिवसांपूर्वी मिळाले होते, मात्र त्यावेळी मी तेव्हा मंत्रालय सोडलं होत असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विदर्भाच्या विकासासाठीही आपण अनेक लढाया लढल्या असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यावर कोरोना काळात कोळशाचं संकट

कोरोना काळात कोळशाचं संकट राज्यावर आले असताना आणि कोळसा आयात करावा लागूनही त्यावेळी वीज कंपन्या योग्य पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला गेला. केंद्राने जीएसटीचा पैसा दिला नाही त्यामुळे अनेक काम थांबली पण काम झाली नाही असं म्हणता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितले. त्याचबरोबर विदर्भात विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही मात्र अनेक कंपन्या विदर्भात आल्या असल्याचे ही त्यांनी सांगितले. एकत्र काम करत असताना संघटनेतील कोणी नाराज आहे असं मला वाटत नाही, माझ्याकडे आलेले सगळे काम मी करत राहिलो आहे त्यामुळे आमच्या संघटनेतील कोणीही नाराज नव्हता.

बंडखोर आमदार

शिवसेनेतील बंडखोर आमदारांविषयी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, जे घडलं ते दुर्दैवी आहे. मात्र उद्या न्यायालयाचा निर्णय येणारच आहे. बंडखोर आमदारांचे जर आरोप होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची कोंडी होत होती, तर मग आरोप करणारे हे आमदार अडीच वर्ष सत्तेत का राहिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्या सर्व आमदारांनी विचार करायला हवे की ज्या उद्धव ठाकरे यांनी त्यांना घडविले त्यांच्या विरोधात जाणे दुर्दैवी आहे. अजून तरी महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं असल्याचेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.