AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उठाव होणारच..! दोन्ही राजे आक्रमक, राज्यपालांच्या वक्तव्याचं सरकारकडे उत्तर मागणार…

राज्यपाल म्हणून तुमचा आदर असला तरी तुमच्या काळ्या टोपीखाली दडलेल्या गोष्टीबद्दल मी आदर बाळगू शकत नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

उठाव होणारच..! दोन्ही राजे आक्रमक, राज्यपालांच्या वक्तव्याचं सरकारकडे उत्तर मागणार...
| Updated on: Nov 27, 2022 | 9:55 PM
Share

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून दोन्ही राजे आता आक्रमक झाले आहेत. उद्या उदयनराजे पत्रकार परिषद घेणार असून माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे. राज्यपालांवर कारवाई न झाल्यामुले सरकारचं त्यांना समर्थन आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही.

कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये.

शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.

राज्यपालांनी इथं नाही कुठेच ठेवू नये, तर संभाजीराजे यांनी सरकारकडे विनंती करत असे राज्यपाल आपल्या राज्यात नको असं सांगितलं आहे.

तर साताऱ्याचे उदयनराजे यांनी 28 तारखेला पत्रकार परिषद घेत ते राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर त्यांनी काय कारवाई केली याची उत्तरं मागणार आहेत.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं भाजपकडून सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी करत त्यांच्यामुळे दोन्ही पक्षामध्ये वितुष्ठ येण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यपालांचा निषेध व्यक्त करून नाही तर त्यांची बॅग भरून त्यांना पाठवून देण्याची व्यवस्था यांनी केली पाहिजे होती अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यपाल म्हणून तुमचा आदर असला तरी तुमच्या काळ्या टोपीखाली दडलेल्या गोष्टीबद्दल मी आदर बाळगू शकत नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांनी उदयनराजेंना भंडावून सोडले होते.

तुमची भूमिका काय असा सवाल करून तुमच्या भूमिकाबाबत कन्फ्युजन असल्याचे त्यांनी सांगितले होते. या प्रकरणावरून आता दोन्ही राजे काय भूमिका घेतात याकडे मात्र साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.