Mumbai : जिनोम सिक्वेंसिंगचा चौदावा चाचणी अहवाल जाहीर, मुंबईत अजूनही ओमिक्रॉनचा धोका
मुंबईमध्ये जे कोरोनाबाधित (Mumbai Corona Update) आढळून येत आहेत, त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हो कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनबाधीत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : गेले दोन वर्ष देशासह राज्यात कोरोनाचे (Corona) संकट होते. लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये जे कोरोनाबाधित (Mumbai Corona Update) आढळून येत आहेत, त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हो कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनबाधीत आहेत. चौदाव्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालातील 100 टक्के चाचणी अहवाल हे ओमिक्रॉनचेच असल्याचे समोर आले आहे. यासाठी एकूण 230 जणांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. बाधितांमधील नेमक्या कोरोनाच्या उपप्रकाराचा शोध घेण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात येते. महापापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये जिनोम सिक्वेंसिंग चाचण्या करण्यात येत आहेत. जिनोम सिक्वेंसिंगचा चौदावा चाचणी अहवाल जाहीर करण्यात आहे. धक्कादायक म्हणजे यातील 100 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनबाधित आढळून आले आहेत.
230 जणांच्या नमुन्यांची चाचणी
कोरोनाबाधितांमधील नेमक्या कोरोनाच्या उपप्रकाराचा शोध घेण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात येते. चौदाव्या जिनोम सिक्वेंसिंग चाचणीचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण 230 जणांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील शंभरटक्के रुग्ण हे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या 230 बाधितांपैकी 74 जणांनी कोरोना लसीची एकही मात्र घेतली नसल्याचे समोर आले आहे. यातील 19 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यातील तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. तर यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
दरम्यान कोरोनाचा धोका ओळखून मुंबई महापालिकेच्या वतीने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर पडताना मास्क वापरा, गर्दी करू नका, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लक्षण दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
