आता दिवाळीपर्यंत स्वस्तच मिळतील भाज्या, असे असतील नवे भाव

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरत स्वस्त झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

आता दिवाळीपर्यंत स्वस्तच मिळतील भाज्या, असे असतील नवे भाव

नवी मुंबई : कोरोनाच्या संकटात एकीकडे आर्थिक संकट असताना दुसरीकडे महागाईदेखील वाढली होती. पण आता सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झालं होतं. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरत स्वस्त झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Good news Mumbai APMC Vegetable Market Prices Stable Due to Increased Vegetable)

मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात गेल्या दोन दिवसांपासून आवक कमी असल्याने भाजीपाल्याच्या किंमतीत दरवाढ झाली होती. मात्र, सर्वसामान्य आता सुटकेचा श्वास घेऊ शकतात. घाऊक बाजारात आज 627 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर हे पुन्हा स्थिर झाले आहेत.

पुणे, नाशिक, नगर, कर्नाटक, गुजरात, जळगाव, लातूर या सर्व ठिकाणांहून आज गाड्यांची आवक मोठया प्रमाणावर झाली आहे अशी माहिती भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. परंतु आज जवळपास 8 महिन्यांनंतर आज एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 627 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. तर आज भाज्यांच्या किंमतीत किती घसरण झाली आहे हे आपण जाणून घेऊया..

काकडी – 20 ते 25 रु किलो मिरची – 35 ते 45 रु किलो शिमला मिरची – 40 ते 60 रु किलो भेंडी – 25 ते 35 रु गवार – 50 ते 60 रु किलो कोबी – 20 ते 30 रु किलो फरसबी – 45 ते 55 रु किलो शेवगा – 50 ते 60 रु किलो रताळे – 25 ते 30 रु किलो कोथिंबीर – 40 ते 60 जुडी मेथी – 15 ते 25 जुडी वाटाणा – 100 ते 140 रु किलो टोमॅटो – 20 ते 30 रु किलो विकला जात आहे.

दरम्यान, सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आता भाज्यांच्या किंमतीत जी घसरण झाली आहे दिवाळीपर्यंत अशीच राहणार असल्याची माहिती भाजीपाला मार्केटच्या संचालक शंकर पिंगळे यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट असलं तरी अशी आर्थिक साथ मिळत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

इतर बातम्या – 

Gold Price: सलग दुसऱ्यांदा 5,500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा दिवाळीपर्यंत काय असेल भाव

पुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

(Good news Mumbai APMC Vegetable Market Prices Stable Due to Increased Vegetable)

Published On - 2:00 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI