राज्यपालांच्या हस्ते न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार प्रदान, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटेंना जीवन गौरव

राज्यपालांच्या हस्ते समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 24 व्यक्तींना 13 वे न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे गुरुवारी प्रदान करण्यात आले

राज्यपालांच्या हस्ते न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार प्रदान, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटेंना जीवन गौरव
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 11:51 PM

मुंबई : भारत देश हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला असून सृजनात्मक लोकांनी तो समृद्ध केला आहे. विविध क्षेत्रातील कलाकार कलेच्या माध्यमातून देशसेवाच करीत आहेत. आपल्या प्रतिभेचा उपयोग सर्वांनी समाजासाठी केल्यास आपण श्रेष्ठ भारत निर्माण करू शकू, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे केले. (Governor presented the 13th Afternoon Newsmakers’ Achievers Awards at Raj Bhavan)

राज्यपालांच्या हस्ते समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 24 व्यक्तींना 13 वे न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे गुरुवारी (26 ऑगस्ट) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न लता मंगेशकर, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, समाजसेविका मंदाकिनी आमटे आणि अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही, त्यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देण्यात आले.

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, एमपीएससीचे सदस्य प्रताप दिघावकर, हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, वकील मृणालिनी देशमुख, वसंत शिंदे, डॉ. पराग तेलंग, रोहण दुआ, पत्रकार खलील गिरकर, पत्रकार संजय जोग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुशांत सिन्हा, चेतन शशीतल, पोलीस अधिकारी सुनील कडासने व उषा पटेल यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आफ्टरनून व्हॉइस वृत्तपत्रातर्फे करण्यात आले होते. वर्तमान पत्राच्या मुख्य संपादिका वैदेही तमन यांनी सूत्रसंचलन व पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.

संबंधित बातम्या:

करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा

भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही; नवाब मलिकांनी सुनावले

भाजपचा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध, मग कोणती पद्धत हवी?; गिरीश बापटांनी केलं मोठं विधान

(Governor presented the 13th Afternoon Newsmakers’ Achievers Awards at Raj Bhavan)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.