AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte wife: जयश्री पाटील नॉट रिचेबल! मुंबई पोलिसांकडून शोध घेण्याचे प्रयत्न सुरु

Gunratna Sadavarte wife: 9 एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्याच दिवसापासून जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडल्यांचं सांगितलं जातंय.

Gunratna Sadavarte wife: जयश्री पाटील नॉट रिचेबल! मुंबई पोलिसांकडून शोध घेण्याचे प्रयत्न सुरु
सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटीलImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 15, 2022 | 6:18 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी (Sharad Pawar Home Attack) सदावर्ते दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वकीस गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील (Gunratna Sadavarte wife Jayashri Patil) यांच्याविरोधातही आता एफआयआर दाखल करण्यात आलंय. त्यामुळे जयश्री पाटील यांचा शोध घेण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पथकं तैनात केली आहे. सदावर्ते यांना झालेल्या अटकेनंतर जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडलं होतं. त्यानंतर आता पोलिसांकडून जयश्री पाटील यांचं शोध घेतला जात असल्याचं सांगितलं जातंय. मात्र अद्याप त्या कुठे आहेत, याबाबतची माहिती कळू शकलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर पोलीस संरक्षण जयश्री पाटील यांनी का सोडलं, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

9 एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्याच दिवसापासून जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडल्यांचं सांगितलं जातंय. जयश्री पाटील या गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीन आहेत. त्या एसटी संपावेळीही गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत होत्या. त्याचप्रमाणे एसटी संपाच्या सुनावणीवेळी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे एकत्रच होते. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना आता अटक झाल्यानंतर जयश्री पाटील यांचाही शोध घेतला जातो आहे.

बुधवारपासून नॉट रिचेबल

गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच, बुधवारपासून जयश्री पाटील या नॉट रिचेबल आहेत. पोलिसांकडून जयश्री पाटील यांचा शोध घेतला जातो आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून पथकंही तैनात करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मुंबई पोलिसांनी जयश्री पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

प्रकरण काय?

शरद पवार यांच्यावर घरावर दुपारच्या सुमारास अचानक काही एसटी कर्मचारी धडकले होते. यावेळी पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी चप्पल फेकून घोषणाबाजी करत काहींनी संताप व्यक्त केला होता. यानंतर पोलीस यंत्रणेचीही तारांबळ उडाली आहे. अचानक उडालेल्या या गोंधळानंतर शरद पवारांच्या घराबाहेर घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.

अनेकांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास केला जातो आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरुवातील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं होतं.

त्यानंतर आता त्यांना एका वेगळ्या प्रकरणी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आता सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात असून, त्यांनाही पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

संबंधित बातम्या :

Gunratna Sadavarte : ‘…त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली’, सदावर्तेंच्या पत्नीचा थेट आरोप

Gunratna Sadavarte | माझी हत्या होऊ शकते, लोकशाहीचा गळा घोटला जातोय; कोर्टात जाताना गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य

गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.