AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या पॅनलला हरवलं, गुणरत्न सदावर्ते यांची निवडणुकीत जोरदार बाजी

गुणरत्न सदावर्ते यांनी आज शरद पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. गेल्या 15 वर्षांपासून शरद पवार यांच्या पॅनलचं ज्या बँकेत वर्चस्व होतं तिथे सदावर्ते यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे.

शरद पवार यांच्या पॅनलला हरवलं, गुणरत्न सदावर्ते यांची निवडणुकीत जोरदार बाजी
| Edited By: | Updated on: Jun 26, 2023 | 6:59 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी खूप मोठा संप पुकारलेला. या संपामुळे महाराष्ट्रातील हजारो गाव-खेड्यांचा थेट तालुक्याशी संपर्क तुटला होता. खासगी प्रवासी वाहनांची प्रचंड भाडेवाड झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्याला न्याय आणि हक्कासाठी हा संप पुकारला होता. जवळपास महिन्याभराच्या संपानंतर मविआ सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही अटी मान्य केल्या होत्या. या काळात सध्याचे निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. ते मुंबई हायकोर्टात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या भल्या मोठा वर्गाचा पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे हा पाठिंबा आज निवडणुकीच्या रुपात स्पष्टपणे दिसून आला आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटीव्ह बँक निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सर्वच जागावर विजय मिळालाय. गेल्या 15 वर्षांपासून या बँकेवर स्टेट कर्मचारी संघटनेचे वर्चस्व होते. स्टेट कर्मचारी संघटना ही राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुरस्कृत मानली जाते. एसटी विलीनीकरण आंदोलनातून एन्ट्री करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी आता स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटीव्ह बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केलंय.

सर्व 19 जागांवर विजय

एसटी विलिनीकरणाच्या आंदोलनातून एसटी आंदोलनात उडी घेणारे निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते हे पहिल्यांदाच बँकेच्या निवडणुकीला सामोरे गेले. त्यांच्याकडून एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेची निवडणूक लढवण्यात आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत सदावर्ते पॅनलला दणदणीत असा सर्व 19 जागांवर विजय मिळालाय.

150 हून अधिक उमेदवारांच्या निवडणुकीत सदावर्तेंच्या पॅनलचा विजय

स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात पॅनलचे 150 हून अधिक उमेदवार आपलं नशीब आजमावत होते. निवडणुकीत उतरलेल्या एसटीतील सर्वच संघटनांकडून महाराष्ट्रभर जोरदार प्रचार करण्यात आला. मात्र, खरी चुरस गुणरत्न सदावर्ते पॅनल आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये बघायला मिळाली.

शरद पवार पुरस्कृत पॅनलच्या हातून 15 वर्षांनी सत्ता निसटली

जवळपास 15 वर्षांपासून कामगार संघटनेचं स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेवर वर्चस्व होतं. मात्र, एसटी आंदोलनानंतर या बँक निवडणुकीला एक वेगळी दिशा मिळाली. खरं तर आंदोलनाला पाठिंबा देणारे भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या पॅनलने देखील आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सपशेल अपयश आलं. यावरुन जे सदावर्तेंना करता आलं ते गेल्या 15 वर्षात इतर कोणालाही जमल्याचं दिसून येत नाही.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.