AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं, आरोग्यमंत्री टोपेंची कडक कारवाई

यवतमाळ घटनेच्या दोषींवर कडक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यममंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. | Health Minister Rajesh tope on yavatmal Case

यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं, आरोग्यमंत्री टोपेंची कडक कारवाई
आरोग्य विभागातील भरतीबाबत राजेश टोपेंचे मोठे विधान
| Updated on: Feb 02, 2021 | 12:00 PM
Share

मुंबई : यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गंभीर दखल घेतली आहे. यवतमाळमध्ये पोलिओऐवजी सॅनिटायझर दिल्याची ही अक्षम्य चूक‌ आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे. त्याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. (Health Minister Rajesh tope on yavatmal Case over 12 children sanitizer Given instead of polio Dose)

यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत. आरोग्यमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेत तिथल्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार  अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना उशीरा जाग आलीय. जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आज (मंगळवार) उपचार घेणाऱ्या चिमुकल्यांची भेट घेतलीय. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणाहीची गय केली जाणार नाही, असं यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कालिंदा पवार यांनी सांगितलं.

आतापर्यंत 3 लाख लोकांना लसीकरण- राजेश टोपे

3 लाख लोकांच्या आसपास आतापर्यंत लस देण्यात आलेली आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल. मात्र पहिल्या टप्प्यात 8 लाख लोकांचं लसीकरण अपेक्षित होतं. आणखी बरचंस लसीकरण बाकी आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंचर दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाचा विचार होईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर लसीकरणाचा दुसरा टप्पा

लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला आणखी काही दिवस जाऊ द्यावे लागतील. कारण पहिल्या फेजमध्ये 8 लाख लोकांचं लसीकरण होणं अपेक्षित होतं. दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याचं काम जलदगतीने सुरु आहे. या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली नावं नोंदवावीत, असं आवाहन राजेश टोपे यांनी सांगितलं.

ब्रिटनच्या स्ट्रेनची काळजी करण्याची गरज नाही

ब्रिटनच्या स्ट्रेनचे काही रुग्ण आपल्याकडे सापडले होते. मात्र योग्य उपचारानंतर ते ठणठणीत बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तसेही त्या रुग्णांची संख्या खूप कमी होती. आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही मात्र सरतेशेवटी काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, असं टोपे म्हणाले.

दरवर्षीपेक्षा आरोग्य क्षेत्राला जास्त निधी मात्र अंमलबजावणी गरजेची

दरवर्षीपेक्षा यंदाच्या केंद्रिय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी जास्त निधीची तरतूद केली आहे. परंतु केवळ तरतूद करुन फायदा नाही. ज्यावेळी अंमलबजावणी होईल तेव्हा सगळं खरं… कोरोनाच्या संसर्गकाळात अंमलबजावणी जास्त गरजेची आहे, असा टोला टोपे यांनी लगावला.

(Health Minister Rajesh tope on yavatmal Case over 12 children sanitizer Given instead of polio Dose)

हे ही वाचा :

आंदोलक शेतकरी हिंदू नाहीत का?; नवाब मलिक यांचा भाजपला सवाल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.